संजय नार्वेकर यांचा मुलगा देखील आहे ‘बालकलाकार’ ?

काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा वास्तव हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये संजय दत्त याने अफलातून काम केले होते.संजय दत्त याने या चित्रपटामध्ये रघुभाईची भूमिका अतिशय जबरदस्तरित्या साकारली होती. त्याची ही भूमिका खूपच लोकप्रिय अशी झाली होती. आजही वास्तव हा चित्रपट टीव्हीवर लागला की, अनेक जन पाहताना दिसत असतात.
या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार देखील दिसले होते.भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सतीश राजवाडे यांच्यासह इतर मराठी कलाकारांनी या चित्रपटात अतिशय दमदार भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर यांनी देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते संजय नार्वेकर यांनी. या चित्रपटांमध्ये ढेड फुट्याची भूमिका साकारली होती.
त्यांची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटात अनेक ऑफर देखील मिळाल्या होत्या. संजय नार्वेकर हे अतिशय हरहुन्नरी कलाकार आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिकेत काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून संजय नार्वेकर हे चित्रपटसृष्टी पासून काहीसे दूर गेल्याचे आपल्याला दिसत आहेत.
त्यामुळे आता ते काय करतात हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. संजय नार्वेकर यांच्या मुलाने देखील अनेक मालिका आणि चित्रपटात काम केल्याचे सांगण्यात येते. संजय नार्वेकर यांनी विनोदी, खलनायक, चरित्र या सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अनेक चित्रपटातून काम करून आपली ओळख निर्माण केली आहे, तर वास्तव या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता.
या चित्रपटात त्यांनी अफलातून असे काम केले होते. संजय नार्वेकर यांनी खबरदार, जबरदस्त, चष्मे बहाद्दर, खारे बिस्किट, हंगामा, वास्तव, जोडी नंबर वन अशा सुपरहिट चित्रपटामध्ये संजय नार्वेकर यांनी अतिशय जबरदस्त असे काम केले आहे. याबरोबर संजय नार्वेकर यांनी नाटक मराठी चित्रपट यामध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. संजय नार्वेकर यांना एक मुलगा असून त्याचे नाव आर्यन नार्वेकर असे आहे.
आर्यन नार्वेकर याने देखील काही वर्षापूर्वी एक चित्रपटात काम केले होते. त्याने बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. त्याने ती भूमिका अतिशय अतिशय उत्कृष्टरित्या साकारली होती. बोक्या सात बंडे या चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राच्या मनात घर केले होते.या चित्रपटातच त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर, शुभांगी गोखले यासारखे दिग्गज कलाकार दिसले होते.
सध्या तरी आर्यन हा आपल्या शिक्षणाकडे लक्ष देत आहे. मात्र, येणाऱ्या काळामध्ये तो चित्रपटात दिसेल असे सांगण्यात येते.