सनी देओल हे त्यांच्या बहिणीचा एवढा ‘रागराग’ का करतात ? समोर आले धक्कादायक कारण

सनी देओल हे त्यांच्या बहिणीचा एवढा ‘रागराग’ का करतात ? समोर आले धक्कादायक कारण

बॉलिवूडमध्ये देओल कुटुंबाची एक आगळीवेगळी ओळख आहे. धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल, हेमा मालिनी आणि ईशा देओल हे सर्वच त्यांच्या अभिनय आणि खास व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध आहेत.

80 आणि 90 च्या दशकात धर्मेंद्रने आपल्या खास अंदाजाने लोकांना वेड लावले, तर सनीने वडिलांच्या पावलांवर चालत अनेक उत्तम चित्रपट दिले. पण, एक गोष्ट बहुतेक लोकांना ठाऊक नसते ती म्हणजे सनी देओल आपली बहीण ईशा देओलचा रागराग करतो. होय हे खरं आहे, सनी देओल आपली बहीण ईशा देओलचा द्वेष करतो.

सनी देओलला त्याची बहीण ईशा देओलबाबत इतका तिरस्कार का आहे

बॉलिवूडमधील दमदार कलाकारांच्या यादीत सर्वात पहिले जर कोणाचे नाव असेल तर ते सनी देओलचे आहे. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तथापि, तो त्याच्या सावत्र बहिणीचा खूप तिरस्कार करतो.

सनी देओल आपली बहीण ईशा देओलचा द्वेष का करतो हे कारण जाणून घेण्यापूर्वी आपण देओल कुटुंबाचा इतिहास पाहूया. आपल्या सर्वांना माहित आहे की सनी देओल बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा आहे. धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौरशी लग्न केले होते, जी त्यांची पहिली पत्नी होती.

सनी देओल आणि बॉबी देओल हे त्यांचीच मुले आहेत. मात्र, प्रकाश कौरपासून घटस्फोट घेतल्यानंतर धर्मेंद्रने हेमा मालिनीशी लग्न केले. दोघांनी 1979 साली लग्न केले आणि धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली झाल्या. सनी देओल आपली बहीण ईशा देओलचा द्वेष करतो असे बरेच जण म्हणतात. तथापि, या प्रकरणात किती सत्य आहे याचा दावा कोणीही करु शकत नाही.

सनीने त्याच्या सावत्र बहिणीशी कोणतेही नातेसंबंध ठेवलेले नाहीयेत

आपल्या सर्वांना माहित आहे की सनी देओल एक अतिशय वेगळा व्यक्ती आहे. तथापि, तो आपली सावत्र बहिण ईशा देओलचा द्वेष करतो. असेही म्हटले जाते की सनी देओलला त्याची सावत्र आई हेमा मालिनीशी कोणतेही नातेसंबंध ठेवायचे नाहीयेत.

वास्तविक, वडील धर्मेंद्र आणि हेमा मालिनीच्या प्रेमसंबंध आणि त्यानंतर लग्नामुळे सनी देओल हादरून गेला होता. या कारणास्तव, ईशा देओल आणि त्याची सावत्र आई हेमा मालिनीशी त्याचे काही नातेसंबंध नाहीयेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सनी देओल आणि त्याची सावत्र आई हेमा मालिनी यांच्या वयामध्ये केवळ 8 वर्षांचा फरक आहे.

सनी देओल हा 63 वर्षांचा आहेत, तर हेमा मालिनी या 71 वर्षांची आहे. सनी देओल आणि ईशा देओल यांच्यातील नात्याविषयीचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा सनी देओल ईशा देओलच्या लग्नात दिसला नाही. यानंतर, सर्व लोकांच्या तोंडात फक्त एकच चर्चा होती की दोघांमधील नातेसंबंध चांगले नाहीयेत. विशेष म्हणजे ईशा देओलनेही बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले पण सनी देओल आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांइतकी ती यशस्वी होऊ शकली नाही.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral