‘या’ अभिनेत्री सोबत संजय दत्तला लग्न करण्याची होती इच्छा, पण त्या एका वाईट कृत्यामुळे..

संजय दत्तला बॉलिवूडमधील खलनायक म्हणून ओळखले जाते. रॉकी चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली, या चित्रपटातील त्याची नायिका टीना मुनीम होती, जी आता धीरूभाई अंबानी चा लहान मुलगा अनिल अंबानीची पत्नी आहे.
संजय दत्त आणि टीना मुनीम हे बालपणीचे मित्र होते, दोघांनीही एकत्र कॉलेज पूर्ण केले, याच दरम्यान ते दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले. टीना मुनीम संजय दत्तवर खूप प्रेम करत होती. संजयने आत्तापर्यंत कोणाचेही ऐकले नाही तो फक्त त्याचा आईचंच ऐकत असत. त्याच नाव आत्तापर्यंत अनेक बॉलीवूड स्टार्स सोबत जोडले गेले त्याची पहिली नायिका टीना मुनिमपासून ते माधुरी दीक्षित पर्यंत.
सुनील दत्तने रॉकी हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, ज्यात सुनीलने संजय दत्त आणि टीना मुनीमला साइन केले होते, संजय दत्तच्या कारकीर्दीचा हा पहिला चित्रपट होता, या चित्रपटासाठी, टीनाने आपले करिअर पणाला लावले होते कारण तिने देवानंदच्या बऱ्याच चित्रपटास नकार दिला होता.
स्वतः संजय दत्त सांगायचा की टीना साठी तो खूप सिरीयस आहे. त्या दोघांनाही रॉकी या चित्रपटानंतर लग्न करायचं होतं पण संजय दत्तची आई नर्गिस मध्यभागी आली म्हणून लग्न करू शकले नाही. शूटिंगच्या वेळी वडील सुनील दत्त या दोघांवर नजर ठेवून असत पण संजय दत्त आणि टीना मुनिम त्यांची नजर चुकवून एकमेकांना मिळत असत.
हळू हळू ही बातमी समोर आली आणि सुनील दत्त आणि नरगिस यांना आपल्या मुलाच्या या कृत्याची माहिती मिळाली. या वृत्तावर सुनील दत्तने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु नर्गिसने हे प्रकरण उचलून धरले कारण नर्गिसला वाटत होते की संजय दत्तची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपाव नाही, म्हणून तिने आपल्या मुलाला टीनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला.
संजय दत्त च्या एका सवयीमुळे टीना संजय दत्त च्या आयुष्यातुन निघून गेली संजय दत्तला अ मली पदार्थांचे व्य सन होते. तो सर्व वेळ न शेत राहायचा, ज्यामुळे टीना त्याच्यावर खूप रागावली होती. टीना त्याला प्रत्येकवेळेस साथ देत होती. पण अगदी टीनानेही आपले करिअर पणाला लावले होते.
टीनाने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण जेव्हा तो सुधारण्यास तयार नव्हता तेव्हा तिने आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय घेतला. टीना संजय दत्तला कायमची सोडून अमेरिकेत गेली. टीनाच्या जाण्याचा धक्का संजय दत्त सहन करू शकला नाही आणि दिवसरात्र दा रूच्या न शेत बुडण्यास लागला.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.