‘हर्षदा खानविलकर’ नव्हे तर ही कलाकार आहे संजय जाधव यांची पत्नी

‘हर्षदा खानविलकर’ नव्हे तर ही कलाकार आहे संजय जाधव यांची पत्नी

रंग माझा वेगळा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री म्हणजे हर्षदा खानविलकर या होत. हर्षदा खानविलकर यांनी या मालिकेमध्ये सौंदर्या अशी भूमिका अतिशय लोकप्रिय केली आहे. या मालिकेच्या माध्यमातून त्या आपला जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना दाखवत असतात.

अनेकदा हर्षदा खानविलकर यांच्या बाबतीतल्या बातम्या देखील सोशल मीडियावर शेअर होत असतात. मात्र, या बातम्या काहीशा चुकीच्या असतात, असे देखील अनेक जण सांगतात, तर आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती सांगणार आहोत.

हर्षदा खानविलकर यांची भूमिका प्रचंड गाजत आहे. हर्षदा खानविलकर हिने या मालिकेत सौंदर्य हे पात्र साकारले आहे. या आधी हर्षदा खानविलकर हिने अनेक चित्रपट व मालिकेतून काम केले आहे. ज्या वेळेस मराठी टेलिव्हिजन कात टाकत होते, त्यावेळेस हर्षदा खानविलकर यांनी पदार्पणात अनेक मालिकेत काम केलेले आहे आदिती सारंगधर, हर्षदा खानविलकर आणि इतर अभिनेत्रींसोबत देखील त्यांनी काम केलेले आहे.

काही दिवसांपूर्वी हर्षदा खानविलकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली होती. यामध्ये ती आपली बहिण मृण्मयी देशपांडे सोबत दिसली होती. मृण्मयी देशपांडेचा वाढदिवस असल्याने दोघींनी तो वाढदिवस साजरा केला. आपल्याला हा प्रश्न पडला असेल की हर्षदा खानविलकरची बहिण आहे आणि तिचे नाव मृण्मयी देशपांडे कसे आहे.

ती हर्षदा खानविलकरची मानलेली बहीण आहे. हर्षदा आणि मृण्मयी यांनी पुढचं पाऊल या मालिकेत एकत्र काम केले होते. त्यानंतर या दोघीमध्ये खूप चांगले रिलेशन तयार झाले. त्यामुळे दोघेही बहिणी बहिणी म्हणून सर्वत्र वावरत असतात. सोशल मीडियावर देखील त्या खूप एक्टिव असतात. आपले फोटो त्या नेहमी अपलोड करत असतात.

हर्षदा खानविलकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील अनेकदा सोशल मीडियावर बातम्या फिरत असतात. हर्षदा खानविलकर यांचे संजय जाधव यांच्यासोबत लग्न झाले आहे आणि त्यांना धीत्री जाधव ही मुलगी आहे, असे देखील सांगण्यात येते. मात्र अनेकांना हे माहीतच नाही की हर्षदा खानविलकर आणि संजय जाधव हे खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी नाहीत.

मात्र, सोशल मीडियावर याबाबतच्या बातम्या खोट्या स्वरूपात पसरविण्यात आलेल्या आहेत. संजय जाधव यांचे लग्न प्रोमीता जाधव यांच्यासोबत झाले आहे, तर हर्षदा खानविलकर आणि संजय जाधव हे केवळ बिजनेस पार्टनर आहेत. अनेक कौटुंबिक कार्यक्रमाला हर्षदा खानविलकर या संजय जाधव यांच्या घरी हजेरी लावतात. त्यामुळे अनेकांना असे वाटले की, हर्षदा खानविलकर आणि संजय जाधव हे पती-पत्नी आहेत.

ही बातमी एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर अनेकांनी यावर व्हिडिओ बनवून टाकले. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले की, हर्षदा खानविलकर या संजय जाधव यांच्या पत्नी नाहीत.

Team Hou De Viral