‘राजा राणीची ग जोडी’ ! संजूचा गावरान अंदाज, रणजितला देणार सरप्राईज

‘राजा राणीची ग जोडी’ ! संजूचा गावरान अंदाज, रणजितला देणार सरप्राईज

कलर्स मराठीवरील “राजा राणी ची ग” जोडी ही मालिका आता रंजक वळणावर जात आहे. संजूला गणपती विसर्जनाच्या ड्युटीमुळे घरी गणपती बाप्पाची सेवा करता आली नाही. त्यामुळे संजू थोडी दुःखी असते. संजूला गणपती विसर्जनासाठी देखील घरी जाता येत नाही. संजू हीची आई गणपती बाप्पाचा आगमनानंतर ढाले पाटील कुटुंबीयांच्या घरी येते.

तेव्हा रणजीत “आईसाहेब” अशी हाक मारतो. तेव्हा आईसाहेब खूप आनंदित होतात त्यानंतर संजू हीची आई गेल्यावर त्या रणजितला बोलतात की, तुम्ही आज मला “आईसाहेब” म्हणालात त्याबद्दल थँक्यू रंजीत. त्यावर रंजीत म्हणतो की, आपले वाद आपल्यातच रहावेत. म्हणून मी त्यांच्यासमोर तुम्हाला “आईसाहेब” म्हणालो. त्यांना हे कळता कामा नये की, त्यांच्या नातवाचा अंत तुम्ही केला आहे.

म्हणून मी तुम्हाला आईसाहेब म्हणालो आणि तिथून रणजीत निघून जातो. गणपती विसर्जनासाठी संजूला घरी येता आले नाही. म्हणून आईसाहेब संजूला गणपती बाप्पाचे दर्शन घेता यावे यासाठी इस्लामपूर रस्त्याने जा, असे सुजित जवळ सांगतात. मात्र, दादासाहेब नकार देत असतात. तर सुजित त्यांना आई साहेब काय बोलल्या हे ऐकवतो. त्यानंतर दादासाहेब शांत होतात आणि संजूला गणपती बाप्पाचे विसर्जना आधी दर्शन घेता येते.

यामुळे संजू खुश होते आणि गणपतीबाप्पाला म्हणते, तुझी सेवा करता आली नाही. त्याबद्दल सॉरी. सुजित म्हणतो की, धन्यवाद दादासाहेबांना म्हणा. ते वेळात वेळ काढून इकडं या असे म्हणाले. संजू त्यांना थँक्यू बोलते. येणाऱ्या काही भागांमध्ये आपण रंजीत आणि संजू यांच्या मध्ये फुलणारे प्रेम नव्या रूपाने पाहणार आहोत. यावर रंजीत देखील आश्चर्यचकित होतो. संजूला या नवीन वेशात पाहून रणजीत आश्चर्यचकित होतो. संजू त्याला सरप्राईज देते.

रंजीत आपल्या शेतात काम करत असताना संजीवनी एका शेतकरी महिलेच्या वेशात येऊन शेतातील भाजी नेते. त्या वेळेला रंजीत तिला अडवतो आणि विचारतो. एवढी भाजी घेऊन कुठे चालला आहात. त्यावर संजीवनी म्हणते की, ही भाजी माझ्या घरचे खाऊन तुम्हाला दुवा देतील. रणजीत यावर म्हणतो की, काय सर्व शेत घेऊन जाल का? संजीवनी त्याला उत्तर देते की, शेती घेऊन जाईल आणि शेताचा मालक बी घेऊन जाईल.

त्यानंतर ती आपला चेहरा रंजीतला दाखवते आणि तिथे संजूला या नवीन वेषात पाहून रंजीत आश्चर्यचकित होऊन तिच्या रुपावर भा. संजीवनी ही नऊवारी पातळ नेसून नाकात नथ घालून मराठमोळी वेशात रंजीत समोर येणार आहे, असे पुढील काही भागांमध्ये आपण पाहणार आहोत.

Team Hou De Viral