रडत रडत साराने आई-वडिलांबाबत केला मोठा खुलासा, म्हणाली 5 वर्षांपूर्वी जेव्हा आई-वडील डिनर ला गेले होते…

रडत रडत साराने आई-वडिलांबाबत केला मोठा खुलासा, म्हणाली 5 वर्षांपूर्वी जेव्हा आई-वडील डिनर ला गेले होते…

सारा अली खान सध्या बॉलिवूडची टॉप अभिनेत्री बनली आहे. सारा अली खान हिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. सध्या तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील आहेत. सारा अली खान ही आपल्या आई वडिलांची खूप लाडकी आहे. काही दिवसांपूर्वी सारा हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, आपल्याला आई-वडील फार प्रिय आहेत. त्यांच्यासोबत आपण काही वर्षांपूर्वी शेवटचे डिनर घेतले होते. त्यानंतर मात्र, आपल्या वडिलांची कधीही भेट झाली नाही.

सारा अली खान हिने केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूत याची भूमिका होती. हा चित्रपट चालला होता. या चित्रपटानंतर तिला चांगली ओळख मिळाली होती. त्यानंतर तिने सिंबा चित्रपटात भूमिका करून चार चाँद लावले होते. केदारनाथ चित्रपटानंतर सुशांत सिंह राजपूत यांच्या सोबत तिचे प्रेम संबंध असल्याची चर्चा होती. त्यानंतर सुशांत सिंह राजपूत याने आ.त्म.ह.त्या केली. त्यानंतर याप्रकरणी सारा अली खान हीची देखील चौकशी करण्यात आली होती.

मात्र, यामध्ये काही तथ्य आढळून आले नाही. त्यानंतर ड्रग्स प्रकरणात देखील सारा आली खानचे नाव समोर आले होते. कोरोना महामारीच्या काळामध्ये कलाकार हे घरीच होते. त्यामुळे त्यांना काही काम नव्हते. आपला वेळ कसा जावा यासाठी ते प्रयत्न करत होते. अनेक जण व्यायाम करून, कोणी टीव्ही पाहून, कोणी पेपर वाचन करून आपला दिवस घालवत होते, तर कोणी सोशल मीडियावर आपले जुन्या आठवणी शेअर करत होते.

सारा अली खान हिने देखील आपल्या जुन्या आठवणी शेअर केलेल्या आहेत. तिने आपल्या लहानपणीच्या अनेक किस्से सांगितले आहे. आई-वडील आपल्याला खूप प्रेम करत असल्याचे तिने सांगितले. मात्र, मी अतिशय कमी वयातच परदेशात शिकायला गेले होते. त्यामुळे आई-वडिलांचे अधिक प्रेम मला जास्त मिळाल नाही.

मात्र, दोघेही माझ्यावर जीव ओवाळून टाकत असल्याचे तिने सांगितले. पाच वर्षापूर्वी परदेशातून भारतात परत आले. वडील सैफ अली खान यांची सारा ही खूप लाडकी आहे. त्यामुळे त्यांनी तिला कोलंबिया येथे शिक्षणासाठी पाठवले होते. काही दिवसांपूर्वी सारा अली खान हिने व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये करण जोहर तिला अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. या शोमध्ये तिने आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.

ज्यावेळी मी परदेशात जाणार होते, त्यावेळी वडील आणि आई यांनी माझ्यासोबत जेवण केले होते. त्यानंतर आम्ही सोबत एकत्र कधी जेवण केले नाही. आता वडील मला कधीतरी भेटत असतात. आई-वडिलांचा घटस्फोट माझ्यासाठी अतिशय वेदनादायी असल्याचे देखील तिने सांगितले. मी परदेशात जाण्याआधी आई माझे अंथरूण स्वतः लावून देत असे. त्यानंतर मी झोपायला जात असे.

वडील देखील मला खूप विचारत होते. मात्र, आता आमची अधिक भेट होत नाही. असे असले तरी वरील माझी आठवण काढत असतात. मला जेव्हा गरज असेल तेव्हा मी त्यांना भेटायला जाते, असेही ती म्हणाली. सारा अली खान हिने बॉलिवूडचे अनेक चित्रपटात काम केले आहे.करीना कपूर हिच्या संबंधाबाबत ती म्हणाली की, आमचा अधिक काही संपर्क होत नाही. मात्र, करीना चांगली अभिनेत्री आहे आणि आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, असेही ती म्हणाली.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral