सारा तेंडुलकरचे पार्टीतील नको ते फोटो झाले व्हायरल; दिसली भलत्याच पोरा सोबत

सारा तेंडुलकरचे पार्टीतील नको ते फोटो झाले व्हायरल; दिसली भलत्याच पोरा सोबत

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या पोस्ट आणि फोटो कायम व्हायरल होत असतात. दरम्यान, सारा तेंडुलकरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या फोटोत सारा तेंडुलकर ही पार्टी करताना दिसत आहे.

मात्र या फोटोत सारासोबत दिसणारा हा मिस्ट्री बॉय कोण आहे याबाबत चाहत्यांच्या मनातील उत्सुकता वाढली आहे. सारा तेंडुलकरचे वास्तव्य सध्या लंडनमध्ये आहे. ती शिक्षणासाठी लंडनमध्ये गेली आहे. मात्र ती शिक्षणाबरोबरच मॉडेलिंग क्षेत्रातही आपला हात आजमावत आहे. साराने काही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी जाहिरात देखील शूट केली होती.

सेलिब्रेटी असलेल्या साराचे नाव भारतीय संघातील उगवता तारा शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात होते. मात्र आता शुभमन सारा तेंडुलकरला नाही तर सारा अली खानला डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सारा तेंडुलकरचे व्हायरल होत असलेले पार्टीतील फोटो पाहून सारासोबत फोटोत दिसणारा तो मिस्ट्री बॉय कोण आहे याची देखील ‘सोशल’ चर्चा सुरू आहे.

सारा तेंडुलकरबरोबर फोटोत दिसणारा तो मिस्ट्री बॉय हा ओरी नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे पूर्ण नाव ओरहान अवात्रामणी असे आहे. पार्टीचे हे फोटो लंडनमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. ओरीची बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींमध्ये उठबस असते.

आरीचे अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण, जान्हवी कपूर यांच्यासोबत पार्टी करतानाचे देखील फोटो व्हायरल झाले आहे.

Team Hou De Viral