देव माणूस मधील सरू आजीची खरी कहाणी आपल्याला माहित आहे का.. जाणून घ्या…

छोट्या पडद्यावर सध्या मालिकांचा सीझन सुरू आहे. कोरोना महामारीनंतर अनेक बंद पडलेल्या मालिका पुन्हा नव्याने सुरू झालेल्या आहेत. सध्या या मालिकांमध्ये कौटुंबिक मालिका या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी झी मराठीवर श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेमध्ये आबा यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती.
त्यानंतरच मराठी मालिकांमध्ये कुटुंबामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती दाखवण्याची प्रथा निर्माण झालेली आहे. आज अनेक मालिकांमध्ये ज्येष्ठ अभिनेते यांचा समावेश असतो. सध्या आई कुठे काय करते या मालिकेत देखील अनेक ज्येष्ठ अभिनेते काम करत आहेत. सध्या देव माणूस ही मालिका चांगलीच गाजत आहे. देव माणूस मधील अनेक पात्र गाजत आहेत. या मालिकेत लहान मुलांच्या भूमिका देखील चांगलेच गाजत आहेत.
मात्र, यातील एक आजीबाई ची भूमिका साकारलेली व्यक्ती सध्या चांगलाच भाव खाऊन जात आहे. होय आम्ही देवमाणूस मधील आजीबाई बद्दलच बोलत आहोत. देव माणूस या मालिकेमध्ये घेणं न देणं गावभर फिरून येणे या आणि इतर अशा म्हणी म्हणणाऱ्या आजीबाई म्हणजेच रुक्मिणी सुतार आहेत. रुक्मिणी सुतार या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांचे वय जवळपास ७० वर्ष आहे. तरी देखील या वयात त्या मराठी मालिकांमध्ये काम करत आहेत.
आजवर रुक्मिणी सुतार यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे .मिसेस मुख्यमंत्री या आणि इतर मालिका काम केलेले आहे. त्यांनी चित्रपटात देखील काम केले आहे. या चित्रपटातील त्यांची भूमिका देखील खूप गाजली आहे. जाऊद्या ना बाळासाहेब, स्वीट होम, बघतोय काय मुजरा कर ोशिंदा, पहिली शेर दुसरी सव्वाशेर या आणि इतर चित्रपटात त्यांनी काम केले आहे.
सध्या देखील त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येत असल्याचे सांगण्यात येते. रुक्मिणी या सिंचन विभागात नोकरीला होत्या. मात्र, त्यांना चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करायची खूप आवड होती. मात्र, कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना त्यांची आवड जोपासता येत नव्हती. त्यामुळे पती आणि मुलांना लपवून त्या नाटकांमध्ये काम करत होत्या.
असे असले तरी नंतर त्यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती मिळाली आणि कुटुंबीयांनी देखील त्यांना चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करण्याची परवानगी दिली. रुक्मिणी सुतार या सध्या अनेक चित्रपट आणि मालिकांमधून काम करत आहेत.
अमिताभ सोबत काम करण्याची इच्छा
रुक्मिणी सुतार यांनी नुकताच एका मुलाखतीत सांगितले आहे की, आपण आजवर अनेक अभिनेत्यांसोबत काम केलेले आहे. मात्र, मला एकदा बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासोबत काम केले तर माझे आयुष्य सार्थकी लागेल. आता ही संधी मला कधी मिळते ते पहावे लागेल. असे त्या म्हणाल्या.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.