तुम्हाला सतत ‘चक्कर’ येत आहे का ? आत्ताच सावधान व्हा, ‘या’ मोठ्या आजारांचे हे लक्षण असू शकते

तुम्हाला सतत ‘चक्कर’ येत आहे का ? आत्ताच सावधान व्हा, ‘या’ मोठ्या आजारांचे हे लक्षण असू शकते

चक्कर येणे किंवा भोवळ येणे ही एक सामान्य समस्या आहे जी जवळजवळ प्रत्येकास कधीतरी कधीतरी उद्भवलेली असेल किंवा आली असेल परंतु आपल्याला जर वारंवार चक्कर येत असल्यास योग्य काळजी घ्यावी कारण हे गंभीर आजार होण्याची लक्षणे असू शकतात.

खरं तर जेव्हा आपल्याला चक्कर येते जेव्हा आपले डोळे, मेंदू, कान, पाय आणि पाठीच्या मज्जातंतूंचा कोणताही भाग काम करणे थांबवतो. वेळीच याची दखल घेतली गेली नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. सतत चक्कर आल्यामुळे आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो आणि कोणत्या कोणत्या आजाराचे हे लक्षण असू शकत त्याबद्दल जाणून घेऊया.

मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही – मेंदूला सतत ऑक्सिजन पुरवठा होणे आवश्यक असते. जर तसे झाले नाही तर त्या व्यक्तीला चक्कर येईल किंवा तो बेशुद्ध होऊन पडेल. या प्रकरणात, आपण शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडे याबाबत तपासणी करुन घ्यावी.

पाण्याअभावी चक्कर येणे – बरेच लोक पाणी कमी पित असतात, अशा परिस्थितीत हळूहळू त्यांच्या शरीरात पाण्याचा अभाव दिसून येतो. यामुळे चक्कर येऊ शकते. ही समस्या विशेषतः वृद्ध आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अधिक सामान्य आहे.

कानाच्या संसर्गामुळेही चक्कर येऊ शकते – कानात संक्रमण झाल्याने देखील चक्कर येऊ शकते. वास्तविक, ऐकण्याच्या आणि संतुलन राखण्याच्या आपल्या क्षमतेवर याचा परिणाम होतो आणि यामुळे बहुधा चक्कर येते. याशिवाय जास्त प्रमाणात औषधांचा सेवन केल्याने देखील चक्कर येऊ शकते.

वारंवार चक्कर येणे या आजारांचे लक्षण असू शकते – वारंवार चक्कर येणे हे बर्‍याच रोगांचे लक्षण असू शकते. जसे – तणाव, मायग्रेन, मज्जासंस्थेची समस्या, ब्रेन ट्यूमर किंवा कानाचा ट्यूमर इ. म्हणूनच वारंवार चक्कर येण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना पहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral