विनोदी अभिनेते ‘सतीश शाह’ ह्यांची बायकोसुद्धा आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री ? पहा फोटो

हिंदी तसेच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे काही मोजकेच अभिनेते आहेत की ज्यांनी दोन्ही भाषांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. यामध्ये अनेक कलाकारांचे नाव आपल्याला घेता येतील. मात्र, सतीश शहा हे असे कलाकार आहेत की, ज्यांनी दोन्ही भाषांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
सतीश शहा यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या “जाने ही दो यारो” या चित्रपटामध्ये अतिशय जबरदस्त असे काम केले होते. त्यांनी या चित्रपटामध्ये एका मृतदेहाची भूमिका केली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड हिट झाली होती. न बोलता ही केवळ झोपून राहून अभिनय कसा करावा, हे सतीश शहा यांनी दाखवून दिले होते. सतीश शहा यांच्या कुटुंब याविषयी अनेकांना माहिती नाही. याबद्दलच आपण आज जाणून घेऊया..
मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपले आभिनयाचा डंका वाजवणारे अभिनेते म्हणजे सतीश शहा. सतीश शहा यांनी हिंदी चित्रपटातही आपल्या जबरदस्त अशा अभिनयाने रसिकांची मन जिंकली आहेत. सतीश शहा यांनी अनेक चित्रपटातून प्रेक्षकांना आपलेसे केले आहेत. त्याचबरोबर सतीश शहा यांनी अनेक मराठी चित्रपटातही काम केले आहे.
गंमत जंमत, फिर भी दिल है हिंदुस्तानी अशा अनेक हिंदी, मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे. आज आपण सतीश शहा यांच्या पत्नीबाबत माहिती जाणून घेणार आहोत. सतीश शहा यांच्या पत्नी या सोशल मीडियापासून खूप दूर आहेत. मात्र, तरीदेखील त्या सर्वांशी संवाद साधून असतात. सतीश शहा यांच्या पत्नीचे नाव मधु शहा असे आहे. मधू शहा या देखील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातूनही काम केले आहे. मधू यांनी साथ साथ, घुमते रह जाओगे अशा हिंदी चित्रपटात त्यांनी काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सतीश शहा यांनी 1972 मध्ये मधू शहा यांच्यासोबत लग्न केले आहे. तर आपल्याला ही जोडी आवडते का? आम्हाला नक्की सांगा.