सख्ख्या आईप्रमाणेच ‘सावत्र’ आईवर देखील खूप प्रेम करतात हे बॉलिवूड स्टार्स, एक तर…

सख्ख्या आईप्रमाणेच ‘सावत्र’ आईवर देखील खूप प्रेम करतात हे बॉलिवूड स्टार्स, एक तर…

एक काळ असा होता की, बॉलीवूड मध्ये लग्न केले तर ते लपवून ठेवावे लागत असे. याचे कारणही तसेच होते. कारण एखाद्या अभिनेत्याचे लग्न झाले आहे, असे समजले तर चहाते त्यांचे चित्रपट हे अजीबात पाहत नव्हते. हाच नियम अभिनेत्रींसाठी होता.जसा काळ बदलला तसा हा नियम देखील बदलताना दिसत आहे. आता सर्रासपणे अभिनेता अभिनेत्री लग्न करत असतात आणि त्यांच्या चाहत्यांना मात्र काही फरक पडत नाही.

तरीदेखील चाहते चित्रपट हे पहात असतात. त्यामुळे बदलत्या ट्रेंडनुसार आता अभिनेते देखील वागत आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये दोन बायका करण्याचा ट्रेंड हा मोठ्या प्रमाणात होता. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशीच माहिती देणार आहोत की, ज्या अभिनेत्यांनी दुसरे लग्न केले आणि त्यांचे अभिनेते असलेले मुले सावत्र आईंना खूप प्रेम करतात. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ते अभिनेते.

1) शाहीद कपूर – शाहीद कपूर याने बॉलिवूडमध्ये आता चांगले नाव कमावले आहे. शाहिद कपूर याने काही वर्षांपूर्वी मीरा कपूर यांच्या सोबत लग्न केले आहे. मात्र, त्याचे असे असले तरी करिना कपूरसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, कालांतराने त्याने लग्न केले. शाहिद कपूर हा अभिनेते पंकज कपूर यांचा मुलगा आहे. पंकज कपूर यांनी देखील बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे.

पंकज कपूर यांनी दोन लग्न केले आहेत. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सुप्रिया पाठक कसे आहे. शाहिद कपूर याच्या खऱ्या आईचे नाव नीलिमा अझीम असे आहे. असे असले तरी शाहिद कपूर हा आपली दुसरी आई सुप्रिया पाठक तिच्यासोबत देखील अतिशय प्रेमाने वागत असल्याचे सांगण्यात येते.

2) सनी देओल – सनी देओल हा दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा आहे. सनी याला बॉबी देओल हा भाऊदेखील आहे. सनी यांनी बॉलिवूडमध्ये अफलातून असे यश मिळवलेले आहे. त्याने अनेक चित्रपटातून काम केलेले आहे. सनी देओल चे वय आता साठीच्या पार आहे. सनी हा आपल्या खऱ्या आईवर देखील खुप प्रेम करतो. असे असले तरी सावत्र आई हेमामालिनी सोबत देखील त्याचे खूप चांगली जमते असे सांगण्यात येते.

3) सारा अली खान – सारा अली खान ही सैफ अली खान याची मुलगी आहे. सारा अली खानची आई म्हणजेच अमृता सिंह ही आहे. काही वर्षांपूर्वी सैफ अली खान पत्नी अमृता सिंह हिला घटस्फोट दिला आहे. आता त्याने करीना कपूर घरोबा केला आहे. करीना कपूर हिला आधीचा तैमूर हा मुलगा आहे. आता ती दुसऱ्यांदा गरोदर आहे. असे असले तरी सारा अली खान आणि करिना कपूर यांचे नाते हे अतिशय चांगले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे दोघींचेही खूप जमत असल्याचे सांगण्यात येते.

4) सलमान खान – सलमान खानला आज बॉलिवूडमध्ये कोण ओळखत नाही. सलमान खान प्रमाणे त्याचे वडील सलीम खान यांची देखील बॉलिवूडमध्ये मोठी ओळख आहे. सलीम-जावेद ही जोडी जुन्या काळी प्रचंड गाजलेली आहे. मात्र, कालांतराने ही जोडी फुटली होती. त्यानंतर सलीम खान आराम करत आहे.

तर जावेद अख्तर यांनी गाणी लिहिण्यास सुरुवात केली आहे. सलीम खान यांनी देखील आयुष्यात दोन लग्न केले आहे. सलीम खान यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव हेलन असे आहे. असे असले तरी सलमान खान हा आपली दुसरी आई हेलनसोबत देखील अतिशय प्रेमाने वागतो. त्यांचे खूप जमत असल्याचे सांगण्यात येते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral