अभिनेत्री शुभांगी गोखले चा ‘जावई’ आहे फेमस मराठी अभिनेता

अभिनेत्री शुभांगी गोखले चा ‘जावई’ आहे फेमस मराठी अभिनेता

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका आली होती. या मालिकेमध्ये दिलीप प्रभावळकर आपल्याला आबाच्या भूमिकेत दिसले होते. ही मालिका त्यावेळेस प्रचंड चालली होती. या मालिकेमध्ये शुभांगी गोखले यांनी देखील काम केले होते.

त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. शुभांगी गोखले यांच्यासह राजन भिसे देखील या मालिकेत आपल्याला दिसते होते. त्यांची ही भूमिका खूप गाजली होती. शुभांगी गोखले या खूप जुन्या अभिनेत्री असून त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहेत. शुभांगी यांच्याप्रमाणे त्यांची मुलगी देखील अभिनेत्री आहे ती देखील आपल्याला अनेक मालिका दिसलेली आहे त्यांच्या मुलीचे नाव सखी गोखले असे आहे.

सखी गोखले ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या आई आणि पतीचे देखील फोटो शेअर करत असते. आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की सखी गोखले हिने कोणासोबत लग्न केले आहे, तर आम्ही आपल्याला याबद्दल माहिती देऊ.

सखी हिने 2019 मध्ये सुव्रत जोशी याच्या सोबत लग्न केले आहे. हे दोघेही आनंदात राहत आहेत.सुव्रत जोशी हा देखील अभिनेता असून त्याने देखील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमध्ये काम केले होते. या मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली. त्यानंतर या दोघांनी लग्न केले आता दोघेही खूप आनंदात राहतात.

शुभांगी गोखले यादेखील आपल्या मुलीचे अधून मधून फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. शुभांगी गोखले या अतिशय हरहुन्नरी अशा अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. शुभांगी गोखले सध्या आपल्याला अनेक मालिकांमधून दिसत असतात. त्यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडतात.

गेल्या काही दिवसापासून हे दोघेही लंडनमध्ये राहतात. सखी हिने लंडनच्या रॉयल कॉलेजमधून मास्टर डिग्री घेतली आहे आणि तिने याबाबतची माहिती देखील आपल्या चाहत्यांना दिली आहे. सोशल मीडियावर तिने ही माहिती दिली आहे. जागतिक महिला दिनी हा कार्यक्रम पार पडला, असे तिने म्हटले आहे. आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबतचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तर आपल्याला सखी गोखले आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral