या मराठमोळ्या अभिनेत्रीला झाला मुलगा, थाटात साजरा केल बारसं

या मराठमोळ्या अभिनेत्रीला झाला मुलगा, थाटात साजरा केल बारसं

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलाकार हे सध्या आपल्या आयुष्याच्या जोडीदारासोबत आनंदाने राहत आहेत. काही अभिनेता आणि अभिनेत्री यांनी नुकतेच लग्न केले आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत काम करणाऱ्या देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिने देखील नुकतेच एका बाळाला जन्म दिला होता. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती देखील दिली होती. मीनाक्षी राठोडच्या पतीचे नाव कैलास वाघमारे असे आहे. कैलास वाघमारे हा देखील अभिनेता आहे.

या दोघांनी काही दिवसापूर्वीच बाळाला जन्म दिला. त्यानंतर आता मीनाक्षी राठोड ही या मालिकेत हल्ली दिसत नाही. आता काही दिवसानंतर ती मालिकेमध्ये पुन्हा दिसणार असे बोलले जात आहे, तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण सोनाली कुलकर्णी हिच्यासह अनेक अभिनेत्रींनी देखील लग्न केल्याचे पाहायला मिळाले.

काही दिवसापूर्वी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने देखील आपल्या प्रियकरासोबत साखरपुडा केला. तिच्या साखरपुड्याला प्रसिद्ध बॉलीवूडचा अभिनेता रितिक रोशन हा देखील उपस्थित होता. तर आता देखील एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्या मुलाच बारसे हे मोठ्या थाटामाटात केले आहे.

कलर्स मराठी वाहिनीवर काही वर्षांपूर्वी आलेल्या हे मन बावरे या मालिकेने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली होती. या मालिकेमध्ये मृणाल दुसानीस आणि शशांक केतकर यांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती. या मालिकेमध्ये अनु हिची खास मैत्रीण नेहा ही भूमिका अभिनेत्री सायली परब हिने साकारली होती.

सायली परब हिने देखील अनेक चित्रपट, मालिकात काम केले आहे. मालिकेतल्या या मैत्रिणी खऱ्या आयुष्यात देखील तेवढ्याच जवळच्या मैत्रिणी आहेत. सायली परब हिने 2020 मध्ये इंद्रनील शेलार याच्यासोबत लग्न गाठ बांधली. 19 ऑगस्ट रोजी या दोघांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. या दोघांनी आपल्या मुलाचं बारसं नुकतच थाटामाटात साजरा केले.

मुलाचं नाव या दोघांनी कबीर असे नाव ठेवले आहे. या नावात खूप मोठे सामर्थ्य आहे. त्यामुळेच आपण आपल्या मुलाचे नाव कबीर असे ठेवले असे देखील या दोघांनी या वेळेस बोलताना सांगितले. आता कबीर याचे बारसे झाल्याने त्याला अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Team Hou De Viral