बॉलिवूड दुःखात ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ‘Scam 1992’ मध्ये बजावली होती महत्वाची भूमिका…

बॉलिवूड दुःखात ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ‘Scam 1992’ मध्ये बजावली होती महत्वाची भूमिका…

बॉलीवूडला एका मागून एक धक्के बसत आहेत. आता देखील बॉलीवूडमधील एका दिग्गज कलाकाराचे निधन झाले आहे. या कलाकाराने कोई मिल गया या चित्रपटात देखील काम केले होते. या अभिनेत्याचे नाव मिथिलेश चतुर्वेदी असे आहे. मिथिलेश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने लखनऊ येथे तीन ऑगस्ट रोजी निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मृत्यू समयी त्यांचे वय हे जवळपास साठ वर्षाच्या आसपास होते, असेही बोलले जात आहे. मिथिलेश हे अतिशय जबरदस्त असे अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपटातून आपल्या भूमिकांनी चमक दाखवली होती. 1997 मध्ये त्यांनी पहिल्यांदा बॉलीवूडमध्ये कामास सुरुवात केली होती. मिथिलेश चतुर्वेदी यांनी 1997 मध्ये आलेल्या भाई भाई या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सत्या चित्रपटातील त्यांची आगळीवेगळी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. ताल, फिजा, रोड, कोई मिल गया यासारख्या चित्रपटातूनही त्यांनी अफलातून असे काम केले. बंटी और बबली, कृष, गांधी माय फादर यासारख्या चित्रपटातून त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. या चित्रपटातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

2020 मध्ये आलेल्या स्कॅम 1992 या वेब सिरीज मध्ये त्यांनी काम केले होते. मिथिलेश सध्या एका चित्रपटात काम करत होते. मात्र मध्येच त्यांनी आता हे जग सोडल्याने अनेकांना धक्का पोहोचला आहे. त्यांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा देखील दिला आहे. त्यांचे निधन झाल्याची बातमी दिग्दर्शक जयदीप सेन यांनी दिली आहे.

तीन ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मिथिलेश जी यांच्यासोबत माझे खूप जुने संबंध होते. कोई मिल गया आणि क्रेझी फोर या चित्रपटात मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटले. मी त्यांना खूप जवळचा होतो, त्यांच्या अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या होत्या.

आपल्या केवळ अभिनयाच्या जोरावरच त्यांनी सर्व चित्रपटांमध्ये न्याय दिला होता. कोई मिल गया या चित्रपटामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने मिथिलेश यांची निवड झाली. राकेश रोशन यांनी त्यांचा फिजा चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटात एक सीन होता. यामध्ये करिष्मा कपूर ही त्यांच्या अंगावर पाणी फेकते.

हा सीन पाहून राकेश रोशन यांना मिथिलेश हे खूप आवडले. त्यानंतरच त्यांनी कोई मिल गया या चित्रपटासाठी त्यांची निवड केली होती. आता मिथिलेश यांचे निधन झाल्यानंतर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Team Hou De Viral