मराठी कलाविश्वातल्या खऱ्या बहिणींच्या जोड्या !

मराठी कलाविश्वातल्या खऱ्या बहिणींच्या जोड्या !

मराठी कला विश्वातील सख्या बहिणींच्या जोड्या मराठी सिनेसृष्टीत त्यांच्या अभिनयाने यशस्वीरित्या प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. जरी या सख्या बहिणी असल्या तरी प्रत्येक बहिणीने आपली स्व:तची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे. कोणी नाटक तर कोणी मालिका तसेच चित्रपटात अभिनय करून या क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

1) पूर्णिमा तळवळकर, पल्लवी वैद्य – या दोघी बहिणींनी अनेक मालिकांमध्ये काम केले. सध्या झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे मन उडू उडू झाल या मालिकेत पूर्णिमा तळवळकर या इंद्रा याच्या आईची भूमिका साकारताना दिसत आहेत.

याआधी पूर्णिमा यांनी होणार सुन मी या घरची या मालिकेत बेबी आत्याची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली, असे म्हणावयास हरकत नाही. सध्या त्या रंग माझा वेगळा या मालिकेत देखील श्वेताच्या आईची भूमिका साकारताना दिसत आहे.

2) गौतमी देशपांडे, मृण्मयी देशपांडे – या दोघींची जोडी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींची जोडी म्हणून ओळखली जाते. मृण्मयी प्रामुख्याने मराठी व हिंदी चित्रपटात भूमिका करते. बॉलीवूड मधील हमने जीना सीख लिया 2018 तर मराठी एक मोकळा श्वास, धामधूम, अनुराग नटसम्राट चित्रपटाचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने येथे करता येईल.

3) खुशबू तावडे, तितिक्षा तावडे – या दोघी बहिणींनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी काम केलेल्या सर्वच मालिका या हिट राहिलेल्या आहेत आणि त्यांना आगामी काळात देखील खूप मागणी असल्याचे दिसते.

4) भार्गवी चिरमुले, चैत्राली गुप्ते – या दोघींची जोडी देखील प्रचंड लोकप्रिय आहे या दोघींनी आजवर मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. भार्गवी हिने काम केलेले अनेक चित्रपट राहिले आहेत.

5) समिधा गुरु, मृणाल देशपांडे – समिधाने देवयानी,कमला, तुजविण सख्या रे अशा अनेक मालिकांमध्ये अभिनेत्री समीधाने ने काम केले आहे.तर पुढचं पाऊल, छत्रीवाली अग्नीहोत्र या मालिकांमध्ये मृणाल यांनी काम केले आहे.

6) सुप्रिया पाठारे, अर्चना नेवरेकर – या दोघींनी देखील मराठी मालिका मध्ये काम केले आहे. सुप्रिया पाठारे या चित्रपट अभिनेत्री असून छोट्या पडद्यावरील मालिका मध्ये देखील त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. सुप्रिया पाठारे या होणार सुन मी या घरची ,कुलवधू ,जागो मोहन प्यारे तसेच ठिपक्यांची रांगोळी इत्यादी मालिकांमधून अनेक भूमिका साकारल्या आहेत.

Team Hou De Viral