‘सुलभा देशपांडे’ च्या सुनेला पाहिलत का? ‘फुलला सुगंध मातीचा’ मध्ये साकारत आहे मुख्य भूमिका

‘सुलभा देशपांडे’ च्या सुनेला पाहिलत का? ‘फुलला सुगंध मातीचा’ मध्ये साकारत आहे मुख्य भूमिका

फुलला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये अभिनेत्री आदिती देशपांडे यांनी साकारलेली आहे. आदिती देशपांडे यांच्या बद्दल आजवर अधिक माहिती कुणाला जास्त माहिती नाही. “फुलला सुगंध मातीचा” या मालिकेमध्ये आपण, वेगवेगळे मनोरंजनात्मक प्रसंग होताना पहात होतो.

या मालिकेमध्ये जीजी अक्का ही भूमिका अभिनेत्री आदिती देशपांडे यांनी साकारली आहे. आदिती देशपांडे या अतिशय कसलेल्या दमदार अशा अभिनेत्री आहेत. आदिती देशपांडे यांचा जन्म मुंबईमध्ये झाला आहे. आदिती देशपांडे यांनी आपले शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले आहे.

सुरुवातीपासूनच त्यांना नाटकांमध्ये काम करण्याची आवड होती. त्यामुळे त्यांनी कॉलेज मध्ये असतानाच दुर्गा झाली हो, झुलवा यासारख्या प्रायोगिक नाटकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांना अनेकांनी संधी दिली. 1996 मध्ये त्यांनी सुरुवातीला करामती हिंदी मालिका केली.

त्यानंतर त्यांना अनेक मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. श्री अधिकारी ब्रदर्स यासारख्या मालिकेमध्ये त्यांनी अफलातून असेच काम केले. त्याचबरोबर नकोशी ही मालिका देखील त्यांची चांगली गाजली होती. त्यात रिश्ता लिखेंगे नया नया या मालिकेमध्ये त्यांनी साकारलेली छोटी ठकुराइन ही भूमिका देखील खूप गाजली होती.

यासोबतच त्यांनी मैहेके चली जाऊंगी ही मालिका केली. ही मालिका ही त्यांची चांगली झाली. नॉट ओन्ली मिसेस राऊत या चित्रपटात देखील त्यांनी काम केले. हा चित्रपट राष्ट्रीय पातळीवर देखील गाजला होता. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला विशेष गौरविण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांनी मायबाप यासारखे चित्रपटातही काम केले.

दशक्रिया हा चित्रपट देखील त्यांचा प्रचंड चालला होता. जोगवा चित्रपटातही त्यांनी अफलातून काम केले. वजनदार, पक पक पकाक यासारख्या चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. आदिती देशपांडे यांचे लग्न निनाद देशपांडे यांच्यासोबत झाले असून त्यांना वीर नावाचा एक मुलगा आहे.

आदिती देशपांडे या प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या सुनबाई आहेत. सुलभा देशपांडे यांचे चार वर्षांपूर्वीच निधन झाले होते, तर आपल्याला “फुलला सुगंध मातीचा” या मालिकेमध्ये आदिती देशपांडे साकारत असलेली जीजी अक्का ही भूमिका आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral