आई आणि बहिणीमुळे तुटले होते का करीना आणि शाहिदचे प्रेमसंबंध, इतक्या वर्षाने झाला मोठा खुलासा

आई आणि बहिणीमुळे तुटले होते का करीना आणि शाहिदचे प्रेमसंबंध, इतक्या वर्षाने झाला मोठा खुलासा

सर्वांना माहिती आहे की सध्या करिना कपूर गर्भवती आहे. नुकतीच, ती येत्या २८ दिवसांच्या लालसिंग चड्ढा या चित्रपटाच्या शूटिंगनंतर मुंबईत आपल्या घरी परतली आहे. तिच्यासमवेत पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूर अली खान देखील होते. तसे, दिल्लीत शूटिंग करताना करीना तिच्या पतौडी पॅलेसमध्ये थांबली होती. यावेळी ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह होती. ती तिच्या चाहत्यांना अपडेट करत होती.

सध्या, करीना आणि शाहिद कपूर बद्दल एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहिदशी करीनाचे दीर्घकाळ प्रेमसंबंध होते. मात्र, नंतर त्यांचे संबंध तुटले आणि दोघेही एकमेकापासून वेगळे झाले होते.करीना आणि शाहिदची प्रेमकथा बी-टाऊनमध्ये बरीच लोकप्रिय झाली होती.

२००४ मध्ये रिलीज झालेल्या ‘फिदा’ चित्रपटाच्या सेटवर दोघांनी त्यांच्या नात्याची सुरुवात केली आणि २००७ मध्ये ‘जब वी मेट’ रिलीज होताच ते एकमेकांपासून वेगळे झाले. पण शाहिद-करीनाच्या ब्रेकअपनंतर तब्बल १२ वर्षांनंतर हे कारण समोर आले होते.बातमीनुसार त्यांचा ब्रेकअप करीनाची बहीण करिश्मा आणि आई बबिता यांच्यामुळे झाल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले जात आहे.

दोघींनीही शाहिदला आपल्या बरोबरीचा मानलं नाही. त्याचबरोबर असेही म्हटले गेले होते की करिनाच्या बहिणीला तिचे शाहिदसोबतचे संबंध सुरुवातीपासूनच आवडत नव्हते. जेव्हा आई बबिताने या नात्यावर शिक्कामोर्तब केले तेव्हा तिची शाहिदसोबत वागायची पध्दत देखील बदलली.

पण, या दोघांचे नातं खराब होण्याचं खरं कारण अद्याप लोकांसमोर आले नाही. होय, असं म्हणतात की ब्रेकअप होण्याच्या आधी शेवटचा कॉल शाहिदने केला होता. तर करीनाने बर्‍याच वेळा पॅचअप करण्याचा प्रयत्न केला होता.२००४ मध्ये सुरू झालेल्या शाहिद-करीनाची लव्ह स्टोरी बी-टाऊन शिवाय मीडियाच्या मुख्य बातम्यावरही झळकत होती.

दोघांनाही बर्‍याचदा एकत्र पाहिले होते. एवढेच नव्हे तर या दोघांनीही आपापल्या नात्याबाबत जाहीरपणे सहमती दर्शविली होती.२००६ मध्ये जब वि मेट या चित्रपटाच्या शूटिंगला दोघांनी सुरुवात केली तेव्हा त्यांचे संबंध चांगले होते. पण चित्रपटाचे शूटिंग संपेपर्यंत त्यांच्या नात्यात पेच निर्माण झाला होता.

चित्रपटाशी संबंधित काही लोकांनी सांगितले की सेटवरील दोघांमधील संभाषण कमी होऊ लागले आहे. जेव्हा शेवटच्या दोन सीन चे शूट करण्यासाठी सेटवर आले तेव्हा ते वेगवेगळ्या कार मधून आले होते.२००७ मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये करीना सैफसोबत दिसली तेव्हा करीना-शाहिदचे नातं तुटल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले.

२०१२ मध्ये या जोडप्याने लग्न केले.करीना-सैफच्या लग्नानंतर शाहिदने मीरा राजपूतशी ३ वर्षानंतर लग्न केले.मुलगी मीशा आणि मुलगा जैन या जोडप्याला दोन मुले आहेत.

Team Hou De Viral