मैं हू खुशरंग हिना…! आत्ता कुठे आहे, काय करते ‘हिना’ची जेबा?

मैं हू खुशरंग हिना…! आत्ता कुठे आहे, काय करते ‘हिना’ची जेबा?

करिना कपूरचे काका राजीव कपूर यांचे नुकतेच निधन झाले. 30 वर्षांआधी राजीव यांनी ‘हिना’ हा सुपरडुपर सिनेमा साईन केला होता. चित्रपटाचे नायक होते दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नायिका होती जेबा बख्तियार. होय, जिच्या सुंदर, निष्पाप चेहयांने चाहत्यांना अक्षरश: वेडे केले होते.

‘हिना’ रिलीज झाला आणि जेबा रातोरात स्टार झाली. पण कालांतराने ही ‘हिना’ बॉलिवूडमधून गायब झाली, ती कायमचीच… जेबाही राज कपूर यांनी शोधलेली हिरोईन होती. ‘हिना’ नंतर जेबा बॉलिवूडच्या काही चित्रपटात दिसली. पण या चित्रपटाला यश मिळू शकले नाही. यानंतर जेबाला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले आणि जेबा बॉलिवूडमधून अचानक गायब झाली, सध्या काय करतेय, हीच आजची स्टोरी आहे.

असे म्हणतात की, जेबाचे सौंदर्य पाहून राज कपूर इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी लगेच तिला ‘हिना’ची आॅफर दिली होती. 1991 साली हा चित्रपट रिलीज झाला. जेबासोबत ऋषी कपूर आणि अश्विनी भावे या चित्रपटात होते. पण जेबाच्या अभिनयापुढे सगळेच फिके पडले. या चित्रपटात जेबाने ‘हिना’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. ‘मैं हू खुशरंग हिना’ हे या चित्रपटाचे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते.

जेबाचे खरे नाव शाहिन आहे. पाकिस्तानी नेता आणि माजी अ‍ॅटर्नी जनरल याह्या बख्तियारची ती मुलगी. लाहोरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेबा पाकिस्तानात छोट्या पडद्यावर काम करू लागली. 1988 साली ‘अनारकली’ या मालिकेत तिने काम केले. हीच मालिका पाहून राज कपूर यांनी जेबाला आॅफर दिली असे म्हणतात.

बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाल्यावर जेबाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या आयुष्यात जेबाने एक नाही, दोन नाही तर चार लग्न केलीत. जेबाने सलमान वालियानीसोबत पहिले लग्न केले. त्यांना एक मुलगीही झाली. पण हे लग्न फार काळ टिकले नाही.

यानंतर जेबाने अभिनेता जावेद जाफरीसोबत लग्न केले. अर्थात जेबाने या लग्नाचा इन्कार केला. पण जावेदने ‘निकाहनामा’ दाखवल्यावर खरे ते सगळे जगासमोर आले. सिंगर अदनान सामीसोबत जेबाने तिसरे लग्न केले. अदनान व जेबा यांना एक मुलगा झाला. पण जेबाचे हे दुसरे लग्नही केवळ दोन वर्षे टिकले. 1996 मध्ये दोघे विभक्त झालेत.

बॉलिवूडमधील करिअर संपल्यानंतर जेबा पाकिस्तानला परतली होती. येथे तिने सोहेल खान लेगारीसोबत चौथे लग्न केले. सोहेल कोण, याबद्दल फार माहिती नाही. सध्या जेबा पाकिस्तानात मालिका दिग्दर्शित करतेय.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral