३० वर्षे इंडस्ट्रीत, शाहरुखसोबत भूमिका; तरीही लोकप्रिय अभिनेत्रीला काम मिळेना, झाली वाईट अवस्था

३० वर्षे इंडस्ट्रीत, शाहरुखसोबत भूमिका; तरीही लोकप्रिय अभिनेत्रीला काम मिळेना, झाली वाईट अवस्था

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे की जिथे एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीची चलती असेल तरच त्याला कोणी विचारते. मात्र ज्या वेळेस तुमचा काळ निघून जातो, त्यावेळेस तुम्हाला कोणी विचारत नाही. बॉलीवूडमध्ये एखाद्या गोष्टीला वापरून सोडून देण्यात येते. एखाद्या अभिनेत्रीला सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये यश मिळालं आणि दुसरा चित्रपट जर फ्लॉप झाला तर तिला नंतर कोणीच विचारत नाही.

आता असाच काहीसा प्रकार एका दिग्गज अभिनेत्रीसोबत झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अभिनेत्रींने शाहरुख खानसह अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. तीस वर्षे ती चित्रपटसृष्टी मध्ये कार्यरत आहे. या अभिनेत्रीचे नाव डेलनाज इराणी असे आहे. डेलनाज हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने आपल्याला काम मिळत नसल्याने खंत व्यक्त केली आहे.

या मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, मी नीना गुप्ता नाही आहे, पण कोणीतरी मला काम देईल, अशी तिने अपेक्षा व्यक्त केली आहे. मी कित्येक वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करते. मात्र मला काम मिळत नाही,याची खंत वाटते. तिने एक मुलाखत देऊन अनेक खुलासे देखील केले आहेत. कल हो ना हो या चित्रपटानंतर मी कोणत्याही चित्रपटाची जोडले गेले नाही.

कुठलाही दिग्दर्शक आणि निर्माता यांनी माझ्यासोबत संपर्क केला नाही. मी देखील केला नाही. सतीश कौशिक यांनी कल हो ना हो पाहिला आणि मला कॉल केला पण ते आता नातं आमच्यामध्ये राहिलं नाही. आता चित्रपटसृष्टीमध्ये काम करायचे असेल तर खूप स्ट्रगल आहे, हे देखील मला तेवढेच आवर्जून नमूद करावे लागते. चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळे गट आणि तट निर्माण झाले आहेत, असे देखील म्हटले आहे.

सोशल मीडियावर जुन्या कलाकारांच्या कामावर फरक पडत आहे, हे देखील खरंच आहे. सोशल मीडियावर अनेक डायरेक्टर आता चित्रपट देखील तयार करत आहेत. ओटीपी प्लॅटफॉर्मवर हे चित्रपट येत आहेत. गेल्या 30 वर्षापासून मी चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत आहे. मात्र, सोशल मीडिया मध्ये कार्यरत असलेल्या लोकांना महत्त्व मिळते. आजकाल सहाय्यक भूमिकांसाठी अभिनेते देखील तयार होत नाहीत.

त्याचप्रमाणे निर्माते देखील जास्त खर्च करत नाहीत, अशी खंत तिने व्यक्त केली आहे. एकूणच काय तर चित्रपटात काम मिळत नसल्याने डेलनाज ही खूपच नाराज झाली आहे.

Team Hou De Viral