आणि म्हणून घरातल्या देवघरात ‘शनी’ महाराजांची मूर्ती नसते, जाणून घ्या त्या माघील कारण

सनातन संस्कृतीत उपासनेच्या पद्धतीस मोठे महत्त्व आहे. मनाची शांतता आणि जीवनात सकारात्मक उर्जा यासाठी लोक पूजा पाठ आणि देवाची उपासना करतात. सनातन परंपरेचे अनुयायी त्यांच्या घरात देवी-देवतांची मूर्ती ठेवून पूजा करतात.
घरातील मंदिरात तुम्ही अनेक देवतांची मूर्ती पाहिली असेल, पण तुम्ही कधी घरातील मंदिरात शनि महाराजांची मुर्ती पाहिली आहे का ? नाही ना, असे का असेल बर. वास्तविक, शास्त्रानुसार शनि महाराजची मूर्ती घरात ठेवली जात नाही. चला जाणून घेऊया का ते ?
म्हणून घरात शनिदेवाची मूर्ती ठेवू नये –
शास्त्रानुसार शनिदेवाची मूर्ती घराच्या मंदिरात ठेवू नये, उलट असे म्हणतात की घराबाहेरच्या मंदिरात जाऊन शनी महाराजची पूजा करण्याचे विधान आहे. असे मानले जाते की शनिदेवाला शाप मिळाला आहे की ते ज्यांना पाहतील त्याचा नाश होईल. आणि म्हणून शनिदेवाची दृष्टी टाळण्यासाठी त्यांची मूर्ती घरात ठेवू नये.जर तुम्ही मंदिरात शनिदेवाचे दर्शन घ्यायला गेलात तर त्याचे पाय पाहा नाकी त्यांच्या डोळ्यांत पाहून नमस्कार करा.
अशा परिस्थितीत तुम्हाला शनिदेवाची घरीच पूजा करायची असेल तर ते तुमच्या मनात ध्यान करून पूजा करा. तसेच शनिवारी हनुमान जीची पूजा करावी व शनिदेवाची आठवण करावी. याने शनीदेव खूष होतात.
शनिदेवाशिवाय या देवांच्या मूर्ती घरी ठेवू नये –
शनिदेव व्यतिरिक्त राहू-केतु, भैरव आणि नटराज यांच्या मूर्ती घरात ठेवल्या जात नाहीत. घराबाहेर त्यांची पूजा केली जाते. तथापि, आपण जेव्हा घरी असतो तेव्हा त्यांचे मनात ध्यान करू शकता.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.