‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील अविनाशची पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेञी, नाव जाणून तुम्ही शॉक व्हाल

‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील अविनाशची पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेञी, नाव जाणून तुम्ही शॉक व्हाल

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधती हिचा लहान दीर म्हणजे अविनाश होय. अविनाश यांचे नाव शंतनु मोघे असे आहे. शंतनु मोघे याने अनेक मराठी मालिका तसेच नाटक व चित्रपटांत काम केले आहे.

शंतनु मोघे याच्या मालिकांचे नाव सांगायचे झाले तर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत देखील त्याने काम केले होते. या मालिकेत त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका केली होती. या भूमिकेमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात उच्च दर्जाचे स्थान निर्माण केले आहे. यानंतर श्रीराम समर्थ या चित्रपटात देखील शंतनू याने काम केले आहे.

सध्या आई कुठे काय करते या मालिकेत शंतनु अविनाशची भूमिका पार पाडत असताना आपण सर्वच जण पाहत आहोत. ही भूमिका तसे पाहायला गेले तर अतिशय शांत आणि संयमी अशा स्वरूपात अविनाश पार पाडत आहे. नेहमीच घरातील वाद विवाद कसे टाळल्या जातील, हा प्रयत्न अविनाशकडून केल्या जातो.

तसेच तो आपल्या वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हे देखील आपण नुकत्याच झालेल्या आई कुठे काय करते या मालिकेतील वाद-विवादात पाहिले आहे. अरुंधती घर सोडून जाते, तेव्हा तिच्या पाठीशी अविनाश हा खंबीरपणे उभा राहतो आणि वहिनी तू स्वतःची काळजी घे, असे सांगतो. या मालिकेत ज्याप्रमाणे अविनाशचे कुटुंब दाखवले आहे.

त्याचप्रमाणे अविनाशच्या खासगी आयुष्यातील कुटुंबात देखील असेच छान आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या खासगी जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच त्यांचा प्रेक्षकवर्ग उत्सुक असतो. अभिनेत्यांच्या खाजगी आयुष्यात त्यांचे कौटुंबिक जीवन असेल अथवा त्यांच्या बहीण – भावा विषयी माहिती असेल आपण जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो.

असेच काहीसे शंतनु मोघे याच्या बाबतीत देखील आहे. त्याची पत्नी ही देखील अभिनय क्षेत्रातच असून ती तिच्या अभिनयामुळे देखील ती प्रसिद्ध आहे. शंतनु मोघे याची पत्नी दिसायला खूप सुंदर आहे. आपणा सर्वांना तिचे नाव समजल्यावर डोळ्यासमोर येते ती ‘तू तिथे मी’ ही मालिका.

या मालिकेत नकारात्मक भूमिका यशस्वीपणे पार पाडणारी ” प्रिया मराठे” ही शंतनु मोघे याची पत्नी आहे. प्रिया मराठेची तू तिथे मी या मालिकेतील नकारात्मक भूमिका खूपच गाजली होती. प्रिया मराठे हिने अनेक हिंदी व मराठी मालिकेत काम केले आहे. प्रिया मराठे हिने ‘या सुखांनो या’ या मालिकेपासून छोट्या पडद्यावर आपल्या करिअरला सुरुवात केली आहे.

एकानंतर एक तिला मालिका मिळत गेल्या. हिंदी मालिकांची नावे सांगायची झाली तर कसम से, पवित्र रिश्ता, बडे अच्छे लगते है, इत्यादी हिंदी मालिकांचा इथे प्रामुख्याने उल्लेख करता येईल. पवित्र रिश्ता या मालिकेमुळे तर प्रिया मराठे ही घराघरात पोहोचली आहे.

सध्या प्रिया मराठे ही झी मराठी या वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत काम करत आहे.

Ambadas