तान्हाजी फेम शरद केळकरची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री, पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो

तान्हाजी फेम शरद केळकरची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री, पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो

‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे या चित्रपटाला अजय देवगन, सैफ अली खान, काजोल अशी तगडी स्टारकास्ट लाभलेली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आणि प्रेक्षकांनी याला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात तान्हाजीची भूमिका अभिनेता अजय देवगन ने साकारली आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज्यांची भूमिका मराठमोळा अभिनेता शरद केळकरने साकारली आहे.

नुकतेच अभिनेता शरद केळकरचा पत्रकारांशी बोलताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. त्यात त्याला एका महिला पत्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून प्रश्न विचारला, तर शरद केळकरने त्या प्रश्नांत दुरुस्ती करून महिलेला असे सांगितले की, शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणा.

शरद केळकरने प्रसंगवधान दाखवून त्या महिलेची चूक सुधारली. पण यावरून शरद केळकरचा महाराजांबद्दलचा आदर दिसून येतो. शरद ने २००५ मध्ये कीर्ती गायवाडशी लग्न केलं. किर्ती ही टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. किर्ती व शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केले होते. आणि याच मलिकच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम झाले आणि दोघांनी पुढे लग्न केले.

दोघांना किशा नावाची एक गोंडस मुलगी आहे.कीर्तीने छोटी बहू, ससुराल सिमर का, साथ फेरे या लोकप्रिय मालिकेत काम केले होते. रियालिटी शो नच बलीये मध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. शरद केळकर अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी जिम मद्ये ट्रेनर होता, हे खुप कमी लोकाना माहिती असेल. शरदने त्याचे सुरुवातीचे शिक्षण ग्वाल्हेर मद्ये केले.

त्यानंतर त्याने इंदूरच्या प्रिस्टेज कॉलेजमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. एमबीए पूर्ण झाल्यानंतर शरदने फिजिकल एज्युकेशनच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शरदने मुंबई मध्ये एका टेलिकॉम कंपनीमध्ये पार्ट टाइम जॉब देखील केला.

सोबत त्याने जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम देखील केले. काम करत असतानाच शरद मॉडेलिंगसुद्धा करायचा. २००४ मध्ये शरद ला दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘आक्रोश’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर त्याला संधी मिळाली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. नंतर त्याने अनेक हिंदी चित्रपटात काम केलं.

हलचल, रामलीला, इरादा, मोहनजोदारो, रॉकी हँडसम, इरादा इ. बॉलिवूडच्या सिनेमात तो झळकला. आणि या चित्रपटात त्याने उत्तम अभिनय केला होता. बाहुबली चित्रपटात प्रभास ला हिंदी मध्ये त्यानेच आवाज दिला होता. आता शरद केळकर एक डबिंग आर्टिस्ट म्हणून देखील काम करतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral