विक्रम गोखलेंच्या निधनावर हा मराठी अभिनेता भडकला ? धक्कादायक कारण समोर…

विक्रम गोखलेंच्या निधनावर हा मराठी अभिनेता भडकला ? धक्कादायक कारण समोर…

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दोन दिवसापूर्वी निधन झाले आहे. विक्रम गोखले यांचे निधन झाल्यानंतर अवघी मराठी चित्रपटसृष्टी हळहळली आहे. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त करण्यात आला आहे.

विक्रम गोखले हे आपल्या मधून गेल्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. मात्र, त्याआधी त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. काही माध्यमांनी देखील त्यांच्या निधनाची बातमी दिली होती. त्यावेळेस अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली होती. तर काही जणांनी त्यांच्या मृत्यूची चेष्टा केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा काही दिवसांपूर्वी बातमी आली विक्रम गोखले गेल्याची.

त्यानंतर विक्रम गोखले हे खरच गेले आणि त्यानंतरही सोशल मीडियावर विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांची चेष्टा उडवली होती. एकदाचा गेला हा कलावंत असे देखील अनेकांनी म्हटले होते. विक्रम गोखले यांनी केतकी चितळेच्या बाबतीत जी भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची जोड उठली होती.

मात्र, आता त्याच्या मृत्यूनंतरही अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळेच आता एक अभिनेता विक्रम गोखले यांच्या बाबतीतल्या सोशल मीडियातील कमेंट मुळे चांगला खवळला आहे. विक्रम गोखले यांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमातच या कलावंताने विक्रम गोखले यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर टीका करणाऱ्या अनेकांना खडसावले आहे.

हा कलावंत म्हणजे शरद पोंक्षे हे आहेत. शरद पक्ष यांनी सांगितले आहे की, विक्रम गोखले यांच्यासोबत आम्ही काही प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. विक्रम गोखले यांच्याकडे पाहूनच आम्ही आपल्या अभिनयाची सुरुवात केली. नाटकाची सुरुवात केली. मात्र, त्यांच्या मृत्यूच्या आधीच त्यांना काही जणांनी श्रद्धांजली अर्पण केली. याबाबत बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीच्या निधनाची बातमी अशा प्रकारे देण्यात येते ही अतिशय वेदनादायी बाब आहे.

ही अफवा देणाऱ्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे की, एखाद्याच्या मृत्यूवर देखील अशा प्रकारे टीका करण्यात येते हे फार क्लेशदायक आहे, असे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर अशा लोकांना कडक शासन झाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Team Hou De Viral