कॅन्सरच्या उपचारासाठी ‘पैसे’ संपल्यामुळे ‘या’ मराठी अभिनेत्याने सुरू केला हा व्यवसाय ?

कॅन्सरच्या उपचारासाठी ‘पैसे’ संपल्यामुळे ‘या’ मराठी अभिनेत्याने सुरू केला हा व्यवसाय ?

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक अभिनेता व अभिनेत्री यांना वेगवेगळ्या आजाराने ग्रासल्याची बातम्या आपण अनेकदा ऐकल्या असतील. गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या आजारांनी अनेक अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. यामध्ये काही वर्षांपूर्वी दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांना देखील कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने बॉलीवूडने गमावले होते.

त्यानंतर इरफान खान याला देखील अतिशय दुर्मिळ अशा आजाराने घेरले होते. त्यानंतर त्याचे दुःख निधन झाले. इरफान खान हा बॉलीवूडचा अतिशय जबरदस्त अभिनेता होता. त्याने सगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. तसेच त्याने केलेल्या जाहिराती देखील प्रचंड गाजल्या होत्या. याचप्रमाणे इतर कलाकार यांचे देखील वेगवेगळे आजाराने निधन झाले.

नदीम-श्रवण या जोडीतील श्रावण राठोड यांचे देखील कोरोना महामारी च्या आजाराने निधन झाले. आपल्या कुटुंबासोबत कुंभमेळा मध्ये ते गेले होते. मुंबईत परतल्यानंतर त्यांना या आजाराची लागण झाली. त्यानंतर त्यांचे निधन झाले. काही वर्षांपूर्वी मराठमोळी बॉलीवुड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला देखील कॅन्सर सारख्या आजाराने घेरले होते. तिने परदेशात जाऊन कॅन्सरवर उपचार केले. या उपचारानंतर तिचे केस देखील गळले होते.

आता तिने कॅन्सरवर यशस्वीरीत्या मात केली आहे. आता ती आपले फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिचे चाहते देखील त्याला खूप मोठ्या प्रमाणात लाईक करत असतात. हा आजार होणे म्हणजे अतिशय जीवघेणी गोष्ट आहे, असे सोनाली बेंद्रे हिने म्हटले होते. काही वर्षापूर्वी मराठीतील दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे यांना देखील या आजाराने घेतले होते.

मात्र, शरद पोंक्षे यांनी देखील यशस्वीरीत्या या आजारावर मात केली आणि आपले अनुभव देखील त्यांनी एका वृत्तवाहिनीवर चाहत्यांशी शेअर केले होते. त्यांनी सांगितलेले अनुभव ऐकून अनेकांच्या अंगावर काटे उभा राहत होते. मराठीतील दिग्गज अभिनेता दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना देखील याच आजाराने घेरले होते.

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये शरद पोंक्षे यांचे नाव घेतले की वाद हे समीकरण उभे राहते. मात्र, शरद पोंक्षे हे अतिशय जबरदस्त आणि हरहुन्नरी अभिनेते आहेत. आपल्या आजाराबाबत देखील त्यांनी कधीही काही लपवून ठेवले नाही आणि एकदा टीव्ही चॅनलवर देखील त्यांनी आपल्या आजाराबद्दल माहिती दिली. आता त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली असून या मुलाखतीमधील त्यांचा काही भाग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

शरद पवार या मुलाखतीमध्ये म्हणताना दिसत आहेत की, कॅन्सरवर उपचार करत असताना माझ्याकडील सगळे पैसे संपले होते. बँक बॅलन्स देखील संपले होते. त्यामुळे काय करावे हा प्रश्न होता. मध्येच कोरोना काळ लागला होता. त्यामुळे हाताला काम देखील नव्हते. त्यामुळे आम्ही चार-पाच मित्र जाऊन चितळे बंधू मिठाईवाले यांना जाऊन भेटलो आणि त्यांची एक शाखा आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला. ती शाखा आम्ही सुरू केली.

या शाखेच्या माध्यमातून आम्हाला चांगले उत्पन्न होत असल्याचे शरद पोंक्षे यांनी सांगितले. तसेच मी अनेकदा दुकानात जाऊन बसतो. ज्यावेळेस हिशोब आणि पैसे घ्यायचे असतात त्यावेळेस मी दुकानात बसलेला असतो. त्यावेळेस अनेक ग्राहक घेऊन गोंधळतात आणि तुम्ही शरद पोंक्षे यांच्यासारखे दिसतात, असे म्हणतात. त्यावर मी देखील त्यांची मस्करी करत कोण शरद पोंक्षे इथे कशाला येतील, ते असे म्हणतो.

मी असे म्हटल्यानंतर माझे कर्मचारी देखील हसायला लागतात, असे शरद पोंक्षे यांनी सांगितले आहे.

Team Hou De Viral