धक्कादायक ! ‘3 इडियट’ मधल्या अभिनेत्याच्या निधनाची ‘अफवा’, चित्रपटसृष्टीत एकच खळबळ

धक्कादायक ! ‘3 इडियट’ मधल्या अभिनेत्याच्या निधनाची ‘अफवा’, चित्रपटसृष्टीत एकच खळबळ

बॉलीवूडमध्ये कलाकारांना लोकप्रियता मिळाली की त्यांचे चाहते त्यांच्या बाबत माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अनेकदा आपल्या आवडत्या कलाकारासोबत काय सुरू आहे याबाबत माहिती जाणून घेण्याची त्यांना खूप इच्छा असते.

मात्र, अनेकदा काही कलाकार हेतू पुरस्पुर अफवा पूर्ण पसरवत असतात. याचा फटका अनेक कलाकारांना आजवर बसला आहे. दिवंगत अभिनेते कादर खान यांच्या बाबतीत अशा अफवा अनेकदा पसरल्या. कादर खान यांचा मृत्यू झाला, अशी अफवा काही वर्षांपूर्वी पसरली होती. मात्र, त्यावेळेस त्यांचे निधन झाले नव्हते.

मात्र, आता खरोखरच कादर खान यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यात गान कोकिळा लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी यांचे देखील निधन झाले आहे. लता मंगेशकर या आजारी असताना त्यांच्या मृत्यूबाबत देखील खूप बातम्या पसरल्या होत्या. मात्र, काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. असाच प्रकार ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या बाबतीत देखील घडला होता.

दिलीप कुमार हे अनेकदा रुग्णालयात जाऊन आले. त्यानंतर त्यांच्या निधनाच्या बातम्या अनेकदा पसरल्या होत्या. आता देखील एका अभिनेत्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे. हा अभिनेता फार वयस्कर नसला तरी त्याच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पसरली आणि एकच खळबळ उडाली. या अभिनेत्याचे नाव शर्मन जोशी असे आहे.

शर्मन जोशी याचा जन्म नागपुरात झाला. शर्मन हा गुजराती अभिनेते अरविंद जोशी यांचा मुलगा आहे. शर्मन याने गुजराती रंगभूमीपासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. शर्मनने १९९९ मध्ये ‘गॉडमदर’ चित्रपटातून पदार्पण केले.

यानंतर शर्मनने स्टाइल, रंग दे बसंती, गोलमाल, लाइन इन अ मेट्रो, ढोल, ३ इडियट्स, हेट स्टोरी ३, मिशन मंगल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. शर्मन जोशीने वयाच्या २१ व्या वर्षी बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांची मुलगी प्रेरणा चोप्राशी लग्न केले. शर्मनची बहीण मानसी जोशीदेखील एक टीव्ही अभिनेत्री आहे आणि तिने अभिनेता रोहित रॉयशी लग्न केले आहे.

आता शर्मन जोशी याच्याबाबतची एक बातमी समोर आली आहे. शर्मन जोशी याचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मात्र, शर्मन जोशी याने याबाबत खुलासा करून सांगितले की मला काहीही झाले नसून मी ठणठणीत आहे. जो कोणी सोशल मीडियावर असे प्रकार करत असेल त्याच्या विरोधात कडक पावले उचलण्यात यावी, असे त्याने म्हटले आहे.

शर्मन जोशी सोबत त्याचे सासरे प्रेम चोप्रा याच्या निधनाची बातमी देखील समोर आली होती. मात्र, असे काही झाले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Team Hou De Viral