‘या’ कारणामुळे शर्मिला यांनी अजूनही पाहिले नाही सैफ-करीनाच्या दुसऱ्या बाळाला, कारणं जाणून तुम्ही थक्क व्हाल

‘या’ कारणामुळे शर्मिला यांनी अजूनही पाहिले नाही सैफ-करीनाच्या दुसऱ्या बाळाला, कारणं जाणून तुम्ही थक्क व्हाल

आजी-आजोबांचे आपल्या नातवंडांवर सर्वात जास्त प्रेम असते असे म्हटले जाते. पण अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खानच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतरही आजी शर्मिला टागोर यांना त्याला पाहता आले नाही.

करीनाने २१ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. आता करीनाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून ती सध्या बाळासोबत घरी आहे. पण बाळाच्या आजीने म्हणजेच शर्मिला यांनी अजून बाळाचा चेहरादेखील पाहिला नाही.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार शर्मिला टागोर या सध्या दिल्लीमध्ये आहेत. करोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्या दिल्लीहून मुंबईमध्ये आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये प्रवास करणे त्यांच्यासाठी शक्य नाही.

त्यामुळे शर्मिला यांना सैफ आणि करीनाच्या मुलाला भेटायला जमले नाही.२१ फेब्रुवारी रोजी सैफ अली खानने दुसऱ्यांदा बाबा झाल्याची गोड बातमी सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यानंतर इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी करीना आणि सैफवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

त्यामध्ये अर्जुन कपूर, मलायका अरोरा, सोहा खान, कुणाल खेमू आणि इतर कलाकारांचा समावेश होता. सैफ आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान करीनाला पाहण्यासाठी तिच्या घरी पोहोचली होती. त्यावेळी ती गिफ्ट्स घेऊन घरी जात असल्याचे दिसत आहे.

Team Hou De Viral