या मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी झाले नवीन पाहुण्यांचे आगमन, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

या मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी झाले नवीन पाहुण्यांचे आगमन, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला मराठमोठा अभिनेता शशांक केतकर बाबा झाला आहे. होय, शशांकने स्वत: सोशल मीडियाद्वारे ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

शशांकने त्याच्या इंस्टाग्रामवर बाळाचा आणि त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बाळाचा चेहरा दिसत नाही. पण शशांकच्या चेह-यावरचा आनंद मात्र स्पष्ट दिसतोय. शशांकने बाळाचे नामकरण ऋग्वेद असे ठेवले आहे.

‘ ऋग्वेद शशांक केतकर… म्हणजे शंशाकला मुलगा झाला आहे,’ असे त्याने लिहिले आहे.

शशांकने गतवर्षी नाताळच्या मुहूर्तावर बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. शशांक केतकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील श्रीच्या भूमिकेतून घराघरात पोहचला.

तसेच सुखांच्या सरींनी हे मन बावरे, इथेच टाका तंबू, नकटीच्या लग्नाला यायचं हा या मालिकेत त्याने काम केले आहे.मालिकेशिवाय त्याने 31 दिवस, आरॉन, वन वे तिकिट या चित्रपटात काम केले आहे. तसेच पूर्णविराम आणि गोष्ट तशी गंमतीची या नाटकातही त्याने काम केले आहे.

तेजश्री प्रधानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर शशांकने दुसरे लग्न करत आपल्या आयुष्याची नव्याने सुरूवात केली. पेशाने वकील असणा-या प्रियांकासह शशांक पुन्हा रेशीमगाठीत अडकला. वैवाहिक जीवनात खूप खुश असून आपले खाजगी आयुष्य एन्जॉय करत आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral