‘तुझी-माझी रेशीम गाठ’ मालिकेतील शेफालीची बहिण देखील आहे लोकप्रिय अभिनेत्री

‘तुझी-माझी रेशीम गाठ’ मालिकेतील शेफालीची बहिण देखील आहे लोकप्रिय अभिनेत्री

मराठी मालिकांमध्ये सध्या दिग्गज कलाकार देखील आपले नशीब अजमावत असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने प्रचंड थैमान घातले. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. यामध्ये दिग्गज कलाकारांचा देखील समावेश होता. काही दिवसापूर्वी “तुझी माजी रेशीम गाठ” ही मालिका झी मराठीवर सुरू झाली आहे.

या मालिकेमध्ये दिग्गज मराठी अभिनेता श्रेयस तळपदे झळकत आहे. श्रेयस तळपदे यासोबतच मराठीतील दिग्गज अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हीदेखील दिसत आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने मराठी मालिकांना चांगले दिवस आले, असे म्हणावे लागेल. प्रार्थना बेहेरे हिने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. या मालिकेत या दोघांसोबतच मायरा ही बालकलाकार देखील दिसली आहे.

श्रेयस तळपदे याने मराठीसह हिंदीमध्ये देखील आपला दबदबा निर्माण केला आहे. इक्बाल या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू सगळ्यांना दाखवून दिली होती. हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर त्याने शाहरुख खान सोबत “ओम शांती ओम” या चित्रपटातही काम केले. त्याची ही भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली.

त्याचबरोबर रोहित शेट्टीच्या “गोलमाल” सीरिजमध्ये देखील तो दिसलेला आहे. यासह त्याने आणखी काही हिंदी चित्रपट केले आहेत.मराठीत देखील त्याने केलेले सर्व चित्रपट चालले आहेत. “तुझी माझी रेशीम गाठ” ही मालिका आता प्रेक्षकांना खूप आवडू लागलेली आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका खूप चांगल्या झालेल्या आहेत. मात्र, यातील शेफाली हिचे पात्र प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.

शेफाली हिला 500 कोटी रुपये असलेला नवरा हवा असतो. शेफाली हिने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकामध्येही काम केलेले आहे. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये शेफालीच्या बहिणी बाबत माहिती देणार आहोत. शेफालीचे खरे नाव काजल काटे असे आहे. काजल हिने आजवर अनेक चांगल्या चांगल्या मालिकामध्ये काम केलेले आहे.

काजलने झी मराठीवर “तुझे माझे ब्रेकप”, “डॉक्टर डॉन”, “स्वराज्य जननी जिजामाता” यासारख्या मालिकेत काम केले आहे. तिच्या या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत. 2019 मध्ये तिने फिटनेस ट्रेनर प्रतीक कदम याच्या सोबत लग्न केले आहे. काजलच्या सोबतच तिची बहीण देखील अभिनेत्री आहे. तिच्या बहिणीचे नाव स्नेहा काटे शेलार असे आहे. स्नेहा देखील अतिशय उत्कृष्ट असे काम करत असते.

स्नेहा हिने आजवर हिंदी तसेच मराठी चित्रपट व मालिका काम केलेले आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर या मालिकेत सध्या ती झळकत आहे. काही वर्षांपूर्वी तिने ऋषिकेश शेलार याच्या सोबत लग्न केले आहे. ऋषिकेश शेलार हादेखील अभिनेता असून त्याने देखील “स्वराज्य जननी जिजामाता” या मालिकेत काम केलेले आहे.

त्याचबरोबर “सावित्री ज्योती” या मालिकेतील त्याची भूमिका खूप गाजलेली आहे. तसेच “छत्रीवाली”,”लक्ष्मी सदैव मंगलम” या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे, तर आपल्याला या बहिणीची जोडी आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral