‘शेपू’ची भाजी खाल्ल्याने आपल्याला मिळतात हे आरोग्यदायी फायदे !

‘शेपू’ची भाजी खाल्ल्याने आपल्याला मिळतात हे आरोग्यदायी फायदे !

बरेच लोक त्यांच्या आहारामध्ये कोणतीही पालेभाजी आली की नाकं मुरडतात. आणि त्यातल्या त्यात जर ‘शेपू’ची भाजी असली तर खायचा विचारच सोडा. परंतु तुम्हाला माहिती आहे का शेपूच्या भाजीत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नचा मोठ्या प्रमाणात साठा असतो.

शेपू आहारात घेण्यासाठी त्याचा वापर सूप्स, सलाड आणि विविध भाज्यांमध्ये मिसळूनदेखील केला जातो. शेपूत जास्त प्रमाणात कॅलरिज नसल्या तरीही त्यात पोषणद्रव्य अधिक प्रमाणात अढळतात. म्हणूनच आपल्या घरात सर्वसाधारणपणे वर्षानुवर्ष आहारात शेपूचा समावेश हा असतो. चला तर मग जाणून घेऊया आहारात शेपूच्या भाजीचा समावेश केल्याने आपल्याला कोणतरी फायदे मिळतात.

पचनाचे विकार दूर होतात – शेपूची भाजी ही रेचक आणि पचायला एकदम हलकी असते. त्यामुळे पचनक्रियेचा मार्गदेखील मोकळा व स्वच्छ राहण्यास मदत होते. शेपूच्या बिया पचनमार्गातील बाहेरील स्तर स्वच्छ व सुरक्षित राहण्यास मदत होते असे काही संशोधनातून समोर आले आहे. अपचनामुळे छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी शेपू अतिशय फायदेशीर आहे.

हृद्याचे कार्य सुधारण्यासाठी – शेपूच्या भाजीतील पोषक घटकांमुळे ब्लड शुगर सोबतच कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात राहण्यासही मदत होते. परिणामी हृदयाचे कार्य सुधारते. त्यामुळे नैसर्गिकरित्या घातक कोलेस्टेरॉईलचे प्रमाण कमी करून चांगल्या कोलेस्टेरॉईलचे प्रमाण वाढवतात.

झोप येण्यास मदत होते – शेपूच्या भाजीत असलेले फ्लेवोनॉईड्स आणि बी- कॉम्पलेक्स घटक हे आपल्या झोपेच्या बाबतीतल्या समस्या कमी करण्यास मदत करतात. शेपूच्या भाजीमुळे मेंदू व शरीर शांत राहण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हांला नैसर्गिकरित्या शांत झोप येण्यास मदत होते.

हार्मोन्सचे संतुलन राहते – असंतुलित हार्मोन्समुळे अनेक स्त्रियांमध्ये अनियमित मासिकपाळीची समस्या असते. मात्र शेपूतील पोषक घटक हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. तसेच स्त्रीची पुनरुत्पादन क्षमता सुधारण्यास मदत करतात.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते – शेपूच्या बियांमध्ये आढळणारे तेल अनेक आजारांवर फायदेशीर आहे. मधूमेहींसाठी ‘शेपू’ फारच उपयुक्त आहे. रक्तातील साखरेचे सतत वर-खाली होणारे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. तसेच यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीचे कार्यदेखील सुधारते.

संसर्गापासून दूर ठेवतो – शेपूच्या भाजीमधील Polyacetylenes घटक हे अ‍ॅन्टीबॅक्टेरियल आणि दाहशामक असतात. पूर्वीच्या काळी संसर्गापासून बचाव करण्यासाठी जखमेवर शेपूच्या बीया लावल्या जात असे. तसेच शेपूमुळे मायक्रोबायलची वाढ रोखण्यास मदत होते तसेच शरीरातील फ्री- रॅडीकल्सची निर्मिती व प्रभाव कमी करण्यास मदत होते. त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral