वयाच्या विशीत अपूर्वा नेमळेकर अर्थात ‘शेवंता’ दिसायची अशी, फोटो एकदा बघाच

सध्या जगभरात तसेच भारतात को-रोना व्हा-यरसने थैमान घातले आहे भारतामध्ये सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ सर्वसामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील घरात कोंडलेले आहेत. प्रत्येकजण हा घरातच राहून आपल्या कुटुंबियांसोबत हा वेळ घालवत आहे.
सध्या अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत. ते आपले अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. एवढेच नव्हे तर लाइव्ह चॅटद्वारे आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहात आहेत. रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमाळकरदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिच्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच छान दिसत असून हा फोटो काढला त्यावेळी ती केवळ २० वर्षांची होती. तिनेच या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे की, मी २० वर्षांची असताना…
अपूर्वाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोला १५ तासांत २५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून अपूर्वाचे फॅन्स या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत. काहींनी या फोटोत तुला ओळखता देखील येत नाहीये असे म्हटले आहे तर तू खूपच सुंदर दिसतेस अशी कमेंट अनेकांनी या फोटोवर केली आहे.
अपूर्वाचा या फोटोतील लूक खूपच वेगळा आहे. अपूर्वाचे केस खूपच छोटे असून ती हा फोटो काढला त्या वेळात ती खूपच बारीक होती असे आपल्याला पाहायला मिळत आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने जशी प्रेक्षकांची मनं जिंकलीत, तसेच या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलेय. शेवंता आणि अण्णांच्या अदाकारीचे तर चाहते डाय हार्ट फॅन बनलेत. या मालिकेतील भूमिकेसाठी अपूर्वाने सात-आठ किलो वजन वाढवले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.