‘शिळी चपाती’ सुद्धा तुम्हाला बनवू शकते ‘निरोगी’, होतील ‘हे’ 5 ‘खास फायदे’, जाणून घ्या कसे

‘शिळी चपाती’ सुद्धा तुम्हाला बनवू शकते ‘निरोगी’, होतील ‘हे’ 5 ‘खास फायदे’, जाणून घ्या कसे

सामान्यपणे आपण सर्व जाणतो की, शिळे अन्न ज्यास 12 तासापेक्षा जास्त काळ झाला आहे, ते खाल्ल्याने अतिसार, फुड पॉयजनिंग, अ‍ॅसिडिटी आणि अन्य अनेक समस्या होऊ शकतात. असेही म्हटले जाते की, शिळे जेवण पुन्हा गरम केल्याने काही बाबतीत आरोग्याला घातकसुद्धा होऊ शकते. मात्र, तुम्हाला हे जाणून घेतले तर आश्चर्य वाटेल की, आपण शिळे अन्न खाणे टाळतो, पण शिळी चपाती तेवढीच लाभदायक आहे.

चपाती चांगल्यापद्धतीने शेकली गेल्याने तिच्यात मॉश्चर कमी राहते. यामुळे ती खराब होण्याची भिती नसते. शिळी चपाती खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. जास्त उष्ण राज्यात राहणारे लोक 24 तासांची शिळी चपाती हलक्या तापमानात फ्रिजमध्ये ठेवून खाऊ शकतात, असे डॉ प्रियंका रोहतगी, वरिष्ठ सल्लागार, पोषण विशेषज्ञ, अपोलो हॉस्पिटल यांनी म्हटले आहे.

गव्हाच्या चपातीमध्ये भरपूर फायबर असते, यामध्ये सोडियमची मात्रा कमी असते आणि तिचा (जीआय) सूचकांक कमी असतो. हे सर्व तुमच्या पचनासाठी लाभदायक आहे. शिळी चपाती रक्तातील साखरेचा स्तर आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगली आहे. शिळी चपाती नाश्त्यासाठी चांगला पर्याय आहे. प्रत्यक्षात, ही बाजारात मिळणार्‍या तयार ओट्स आणि पोहापेक्षा जास्त लाभदायक आहे, असे डॉ. प्रियंका सांगतात.

1 ब्लड प्रेशर कंट्रोल करते शिळी चपाती – थंड दुधासोबत शिळी चपाती सेवन केल्याने हाय ब्लडप्रेशर वाल्या लोकांना फायदा होऊ शकतो. थंड दुधात शिळी चपाती भिजवा आणि ती दहा मिनिटासाठी तशीच ठेवून द्या. तुम्ही हे सकाळीच्या नाश्त्यात खावू शकता. ती तुमचा बीपी नियंत्रित करण्यासाठी मदत करू शकते.

2 शरीराचे तापमान नियंत्रित करते – सामान्यपणे शरीरीचे तापमान 37 डिग्री सेल्सियस असते. जर ते 40 पेक्षा जास्त झाले तर अवयवांचे नुकसान होते. थंड दुधात भिजवलेली शिळी चपाती शरीराच्या तापमानाला नियंत्रित करण्यात चमत्कारासारखी मदत करते. शिळी चपाती आणि दुध सकाळच्या नाश्त्यात खाल्ल्याने जास्त प्रमाणात पोषक तत्व मिळतात. सोबतच अ‍ॅसिडिटीपासून सुद्धा आराम मिळतो. तुमच्या शरीराचे तापमान सुद्धा नियंत्रित होते.

3 डायबिटीजच्या रूग्णांसाठी वरदान – जर तुम्हाला डायबिटीज आहे, तर सकाळीच्या वेळी शिळी चपाती दुधसोबत खाणे लाभदायक आहे. यामुळे तुमच्या शरीरात साखरेचा स्तर संतुलित राहील.

4 जिमला जाणार्‍यांनी जरूर खावी शिळी चपाती – जिमला जात असाल, आणि बॉडी बनवायची असेल तर शिळ्या चपातीचे आवश्य सेवन करा. अनेक फिटनेस सेंटर आणि जिममध्ये एक्सरसाईजसोबत सकाळी शिळी चपाती दुधासोबत खाण्याचा सल्ला दिला जातो. ताज्या चपातीपेक्षा शिळी चपाती जास्त पौष्टीक असते, कारण जास्त काळ ठेवल्याने तिच्यात जे बॅक्टेरिया असतात ते आरोग्यासाठी लाभदायक असतात.

5 अ‍ॅसिडिटीपासून आराम देते शिळी चपाती – गव्हाच्या चपातीमध्ये आढळणारे फायबर तुमची पचनशक्ती मजबूत करते. पोटाच्या समस्या होत नाहीत. रोज सकाळी दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीपासून मुक्ती मिळते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral