पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीचे बाहेर आले दुःख म्हणाली, ‘अक्षय कुमारने धडकन च्या शुटींगवेळी माझ्या…

पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीचे बाहेर आले दुःख म्हणाली, ‘अक्षय कुमारने धडकन च्या शुटींगवेळी माझ्या…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे नाव घेतले की डोळ्यासमोर एक अतिशय सडपातळ अशी तरुणी उभी राहते. होय शिल्पा शेट्टी हिला तरुणीच म्हणावे लागेल. याचे कारण देखील तसेच आहे. आज तिने वयाची चाळिशी पार केली असली तरी ती आजही तरुणी सारखीच वावरत असते.

याचे कारण म्हणजे शिल्पा शेट्टीने आपला फिटनेस हा अतिशय चांगला ठेवलेला आहे. ती योगा अतिशय चांगल्या प्रकारे करते. बाबा रामदेव यांच्यासोबत तिने काही वर्षांपूर्वी योगा करून धुमाकूळ घालून दिला होता. त्यानंतर शिल्पा शेट्टीला देश आणि परदेशातून देखील मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली होती. शिल्पा शेट्टी चे अंग अतिशय लवचिक आहे. त्यामुळे ती सर्वांमध्येच लोकप्रिय आहे.

सध्या ती चित्रपट जरी करत नसली तरी काही टीव्ही शोमध्ये ती काम करत असते. मात्र, कोरोना महामारी मुळे सध्या ती घरातच काम करत असल्याचे दिसत आहे. शिल्पा शेट्टी हिने आग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये गोविंदा याची भूमिका होती. हा चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रचंड चालला होता. या चित्रपटातील शिल्पा शेट्टी हिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.

मात्र, खऱ्या अर्थाने तिला ओळख मिळाली ती अब्बास-मस्तान यांच्या बाजीगर चित्रपटामधून. या चित्रपटांमध्ये तिची छोटीशी भूमिका होती. मात्र, असे असले तरी तिने खूप भाव खाल्ला होता. शाहरुख खान या चित्रपटात होता आणि काजोल देखील या चित्रपटात होती. मात्र, तरीदेखील तिची भूमिका भाव खाऊन गेली होती. त्यानंतर तिची जोडी अक्षय कुमार सोबत चांगली जमली.

मै खिलाडी तु आनाडी या चित्रपटात तिची भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटातील चुराके दिल मेरा हे गाणे प्रचंड गाजले होते. त्यानंतर शिल्पा शेट्टी ने अक्षय कुमार सोबत खूप चित्रपटात काम केले. त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. शिल्पा शेट्टी अक्षय कुमार याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. तिने तिचे करिअर सोडण्याचा देखील विचार केला होता.

मात्र, त्याच वेळी अक्षय कुमार याचे टिंकल खन्ना सोबत प्रेम प्रकरण चालू होते. त्यामुळे शिल्पा शेट्टी ही खूप नाराज झाली होती. त्यानंतर अक्षय कुमार याने ट्विंकल खन्ना सोबत लग्न केले आणि शिल्पा शेट्टी ही नाराज झाली. तर शिल्पा शेट्टी ने देखील राज कुंद्रा या उद्योगपती सोबत लग्न केले. त्यानंतर दोघेही आता सुखी संसार करत आहेत. या दोघांना एक मुलगा आहे.

शिल्पा शेट्टी ने त्यानंतर अक्षय कुमार सोबत काही चित्रपटात काम केले. मात्र, त्यातील एक चित्रपट सर्वांच्याच लक्षात राहिला. तो म्हणजे धडकन. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. हा चित्रपट अनेक आठवडे चित्रपट खिडकीवर होता. त्यावेळी मल्टिप्लेक्स नव्हते. त्यामुळे सुमारे 25 आठवडे हा चित्रपट चित्रपट खिडकीवर होता.

2000 ते 2004 या कालावधीमध्ये हा चित्रपट आला होता. या चित्रपटांमध्ये सुनील शेट्टी याची भूमिका होती. चित्रपटाचे संगीत अतिशय सुमधुर असे होते. या चित्रपटासाठी अनेकांनी संगीत दिले होते. त्यामुळे चित्रपटाची गाणी श्रावणीय असे झाले होते. मात्र, या चित्रपटाबाबत शिल्पा शेट्टी हिने एक खंत बोलून दाखवली आहे. काही दिवसापूर्वी देखील तिने ही खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.

शिल्पा शेट्टी म्हणाली, मला लोक अभिनेत्री मानतच नाहीत. त्यामुळे मला पुरस्कार मिळत नाही. मात्र, असे असले तरी आपण आपला अभिनय पूर्ण ताकतीने केला होता. धडकन चित्रपटासाठी मला पुरस्कार मिळाला नाही. याची खंत असल्याचे तिने सांगितले होते. तसेच आपल्याला या चित्रपटासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. असेही ती म्हणाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मी माझ्या ओठांवर लाल लिपस्टिक लावत होते.

हे लिपिस्टिक मला खूप चांगले दिसत होते, असे मला अनेकजण सांगायचे. तरीदेखील मला या चित्रपटासाठी पुरस्कार नाही मिळाला, याची मला आयुष्यभरासाठी खंत राहील असेही ती म्हणाली.शिल्पा शेट्टी हे नाव अक्षय कुमार यांच्या सोबतच केवळ जोडले गेले. त्यानंतर तिचे नाव दुसऱ्या अभिनेता सोबत जोडले गेले नाही. ते आजपर्यंत तरी ऐकण्यात आले नाही. मात्र, आता ती संसारात रममाण झाली आहे.

Team Hou De Viral