बाबो, ही अभिनेत्री ‘पायजमा’ न घालताच गेली होती मुलाच्या शाळेत, त्या फोटोमुळे पुन्हा झाली ट्रोल

बाबो, ही अभिनेत्री ‘पायजमा’ न घालताच गेली होती मुलाच्या शाळेत, त्या फोटोमुळे पुन्हा झाली ट्रोल

शिल्पा शेट्टी नेहमी फिटनेस आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. तिच्या हटके ड्रेसिंग स्टाइलने चाहत्यांना ती घायाळ करत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. अर्थात चर्चेत यायलाही ड्रेसिग स्टाइलच कारणीभूत ठरला आहे.

शिल्पा शेट्टीचा जुना फोटो व्हायरल झाला आहे. त्याच फोटोमुळे तिला जबरदस्त ट्रोल केले गेले होते.पुन्हा एकदा या फोटोमुळे शिल्पा ट्रोल होत आहे. या फोटोमुळे नटीझन्स तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. या फोटोत शिल्पाने कुर्ता परिधान केला असून खाली पायजामा मात्र घातलेला दिसत नाहीय.

त्यामुळे शिल्पा ”पायजामा घालायला विसरली की काय” अशा कमेंटस तिच्या या फोटोला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.लग्नानंतर मात्र शिल्पा शेट्टी आपल्या संसारात आणि मुलामध्ये बिझी झाली. तरीही तिचे सिनेमावरील प्रेम काही कमी झालं नाही.

त्यामुळे लग्नानंतरही सिनेमा आणि विविध रिअॅलिटी शोच्या माध्यमातून शिल्पा रसिकांच्या भेटीला येत असते. सध्या विविध पार्ट्या, इव्हेंट्स आणि सोहळे आणि फिटनेस व्हिडीओमधूनही शिल्पाचं दर्शन रसिकांना होत असतं.तिचा डान्स, तिची अदा, तिचा अभिनय… तिच्या प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा होतात.

गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री हे बिरुद मोठ्या मानाने मिरवलं आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब लक्षात घेवूनच शिल्पा शेट्टीने मोठ्या मेहनतीने स्वतःमध्ये बदल केले आहेत.

फिटनेसवरही ती लक्ष केंद्रित करते. नित्यनियमाने ती योगा आणि योग्य डाएट घेते. त्यामुळे शिल्पा शेट्टी आजही तितकीच सुंदर दिसते. तिचा प्रत्येक लूक पाहून चाहते आजही तितकेच फिदा होता. शिल्पा शेट्टीची जादु आजही चाहत्यांवर कायम आहे. सुंदर दिसण्यासाठी फिट राहण्यासाठी शिल्पा खूप मेहनत घेते हे तर जगजाहीर आहे.

योगाभ्यास आणि वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या या व्हिडीओपासून अनेकांना वर्कआऊटची प्रेरणा मिळाली असेल आणि तेही फिटनेसबाबत सजग झाले असतील.

Team Hou De Viral