दिग्गज अभिनेते शिवाजी साटम यांच्यासोबत घडली दुःखद घटना

दया कुछ तो गडबड है, दया तोड दो ओ दरवाजा अशा नानाविध डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांचा काही रुबाब वेगळाच आहे. मराठीसह हिंदी चित्रपटात त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. त्यांनी काम केलेले सगळे चित्रपट हे लोकप्रिय झालेले आहेत. शिवाजी साटम हे अतिशय जबरदस्त असे अभिनेते आहेत.
मात्र, सीआयडी या मालिकेने त्यांना खऱ्या अर्थाने वेगळी ओळख मिळवून दिली. सीआयडी या मालिकेने अनेक विक्रम केलेले आहेत. तब्बल 18 वर्ष ही मालिका छोट्या पडद्यावर सुरू होती. मात्र, ही मालिका नंतर बंद करण्यात आली. आता देखील या मालिकेचे जुने भाग प्रेक्षक आवडीने पाहतात. या भागांना आठवून ते आपला जुना काळ देखील आठवत असतात.
शिवाजी साटम यांनी मराठीतील “दे धक्का” या चित्रपटातील अफलातून असे काम केले. त्याचबरोबर वास्तव या चित्रपटात संजय दत्तच्या वडीलाची भूमिका सार्थक करताना त्यांनी सामान्य माणूस कसा असतो हे देखील दाखवून दिले होते, शिवाजी साटम हे सामाजिक कार्यात देखील सक्रिय असतात. शिवाजी साटम यांच्या मुलाचे नाव अभिजीत साटम असे असून अभिजित याने प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर हिच्या सोबत लग्न केले आहे.
मधुरा वेलनकर ही प्रदीप वेलनकर यांची कन्या आहे. प्रदीप वेलनकर हे देखील अभिनेते आहेत. आता शिवाजी साटम यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या आप्पासाहेब पाटील यांनी केली आहे. कारण की शिवाजी साटम यांनी ऑनलाईन रमी खेळण्याची जाहिरात केली आहे आणि ही जाहिरात तरुणांना बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोप आप्पासाहेब पाटील यांनी लावला आहे.
मात्र, शिवाजी साटम यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मराठीतील सई ताम्हणकर हिच्यासह अनेक कलाकार हे ऑनलाईन रम्मीची जाहिरात करताना दिसतात. अन्नू कपूर, रितिक रोशन याच्यासह काही क्रिकेटपटू देखील ही जाहिरात करताना दिसतात. मात्र, आता शिवाजी साटम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तर शिवाजी साटम यांनी केलेली ही जाहिरात योग्य वाटते का? आम्हाला नक्की सांगा.