‘या’ एका निर्णयाने संपले शोमा आनंदचे फिल्मी करिअर, आता काय करते ही अभिनेत्री?

‘या’ एका निर्णयाने संपले शोमा आनंदचे फिल्मी करिअर, आता काय करते ही अभिनेत्री?

‘हम पांच’ ही मालिका आठवत असेन तर हा चेहरा तुम्ही कधीही विसरू शकत नाही. होय, तिचे नाव शोमा आनंद. आज शोमाचा वाढदिवस. 16 फेब्रुवारी 1958 साली जन्मलेली ही अभिनेत्री आई, बहीण, पत्नी अशा अनेक भूमिकेत दिसली. आज ती टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा आहे.

ऋषी कपूरची हिरोईन म्हणून शोमाने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 1976 मध्ये रिलीज झालेल्या ‘बारूद’ या सिनेमात शोमा आनंद लीड रोलमध्ये होती. हिरो होता ऋषी कपूर. या चित्रपटात शोमाने अनेक बोल्ड सीन्स दिलेत. पण याऊपरही तिचा हा पहिला सिनेमा आपटला.

यानंतर तिने काही चित्रपट केलेत. पण त्यांना म्हणावे तसे यश लाभले नाही. पुढे बॉलिवूडमधील करिअर मार्गी लागणार त्याआधीच शोमाने असा काही निर्णय घेतला की, बॉलिवूडमध्ये ती केवळ सपोर्टींग रोलपुरतीच मर्यादीत राहिली.होय, हा निर्णय म्हणजे निर्माता-दिग्दर्शक तारिक शाहसोबतचे लग्न. 1987 मध्ये शोमाने तारिकसोबत लग्न केले.

लग्नानंतरही शोमाला इंडस्ट्रीत काम करायचे होते. पण सासरच्या मंडळींचा याला विरोध होता. या विरोधामुळे शोमाने अखेर इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. मग काय या ब्रेकने तिच्या फिल्मी करिअरलाही मोठा ब्रेक लागला. यानंतर तिच्या वाट्याला आलेत ते केवळ सपोर्टिंग रोल. बॉलिवूडने निराशा केल्यानंतर शोमाने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली.

‘हम पांच’ या शोमधून शोमा छोट्या पडद्यावर आली. छोटा पडदा मात्र तिच्यासाठी लकी ठरला. या मालिकेने शोमा घराघरांत पोहोचली. पुढे अनेक मालिकांमध्ये ती दिसली. पण यानंतर कधी हिरोची बहीण, कधी वहिणी, कधी डॉक्टर अशा भूमिका तिला मिळाल्या. अर्थात या रोलमध्येही शोमाने यादगार अभिनय केला.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral