श्रद्धा कपूरचे वडीलच नव्हे तर आई देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, लता मंगेशकर यांच्याशी आहे खास नाते

श्रद्धा कपूरचे वडीलच नव्हे तर आई देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, लता मंगेशकर यांच्याशी आहे खास नाते

शक्ती कपूरची मुलगी आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रध्दा कपूर ही आता 34 वर्षाची झाली आहे. 3 मार्च 1987 मध्ये मुंबई मध्ये जन्मलेल्या श्रद्धाने 11 वर्षापूर्वी 2010 मध्ये आलेल्या तीन पत्ती या चित्रपटाद्वारे करिअरची सुरवात केली होती.श्रद्धाने तिच्या या 11 वर्षाच्या काळामध्ये 20 चित्रपटात काम केले आहे.

श्रद्धाच्या बाबतीत लोकांना जवळपास सगळं माहिती आहे पण ही गोष्ट बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल की श्रध्दा ची आई शिवांगी कपूर हिने देखील अभिनेत्री म्हणून काम केलेले आहे.शिवांगी कपूर अत्ता जरी या चित्रपटसृष्टीपासून लांब असल्या तरी 80च्या दशक मध्ये यांनी चित्रपटात काम केलेले आहे.

शिवांगी ने तिच्या करिअची 1980 मध्ये आलेला किस्मत या चित्रपटापासून केली होती.या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि रंजिता लीड रोल मध्ये होते.या चित्रपटात शक्तीने कपूर ने देखील काम केले आहे.दोघांची पहिली भेट या चित्रपटाच्या सेटवरच झाली होती.

या सेटवरच मग या दोघांची दोस्ती प्रेमात बदलायला लागली व नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.पण यांच्या लग्नामध्ये सगळ्यात जास्त अडथळा येत होता तो त्यांच्या घरातील लोकांचा शिवांगी चे आई-वडील या लग्नासाठी तयार नव्हते त्यामुळे या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

या दोघांनी 1982 मध्ये पळून जाऊन लग्न केले.त्यावेळेस शिवांगी चे वय अवघे 18 वर्ष होते.लग्नानंतर शिवांगी ने चित्रपटात काम करणे सोडून दिले आणि तिच्या सांसारिक आयुष्यात मग्न झाली.आता ते दोघे आपल्या छोट्या आणि सुखी परिवार सोबत आनंदी जीवन जगत आहे.

तुमच्या माहिती साठी की श्रद्धाची आई शिवांगी चा जन्म मुंबईमध्येच झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव पंढरीनाथ कोल्हापूरे होत.शिवांगी ने तिचे शिक्षण संपविल्यानंतर बॉलीवूडमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

शिवांगी आणि शक्ती कपूर यांचे दोन्ही मुले श्रद्धा आणि सिध्दांत चित्रपटसृष्टी मध्ये चांगलेच नाव कमवत आहेत.श्रध्दा जशी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे तसेच सिद्धांत देखील एक अभिनेता असल्या बरोबर एक दिग्दर्शक देखील आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral