‘चला हवा येऊ द्या’ फेम ‘श्रेया बुगडे’ च्या नवऱ्याला पाहिलंत का ? करतो हे काम

‘चला हवा येऊ द्या’ फेम ‘श्रेया बुगडे’ च्या नवऱ्याला पाहिलंत का ? करतो हे काम

आपण अनेकदा मालिका पाहत असताना त्यामध्ये काम करत असलेल्या अभिनेता व अभिनेत्री यांच्या खऱ्या पती-पत्नी बद्दल माहिती जाणून घेण्यास इच्छुक असतो. मात्र, आपल्याला ही माहिती अनेकदा मिळताना दिसत नाही. मालिकेत काम करणाऱ्या दोघांपैकी काही जोड्या अशा आहेत की, ज्या खरे आयुष्यामध्ये पती-पत्नी देखील आहेत.

यामध्ये सुखदा खांडकेकर व अभिजीत खांडकेकर हे पती पत्नी आहेत. तसेच सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर हे देखील पती-पत्नी आहेत. आणि विशेष म्हणजे हे दोघेही अभिनेता व अभिनेत्री आहेत. आज आपण या लेखामध्ये चला हवा येऊ द्या मधील श्रेया बुगडे हिच्या पती विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

श्रेया बुगडे हिने अनेक मालिकांतून काम केले आहे. तसेच रियालिटी शोमध्ये देखील काम करते. तिचा सेन्स ऑफ ह्युमर हा कमालीचा आहे. ती विनोद देखील तितक्याच चांगल्या अंदाजाने करत असते. श्रेया बुगडे हिने चला हवा येऊ द्या या मालिकेमध्ये तर अफलातून असे काम केले आहे. तिची जोडी ही कोणासोबतही उठून दिसत असते.

वैयक्तिक आयुष्यात देखील ती आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर तिचे अकाउंट आहे. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. श्रेया बुगडे हिने इंस्टाग्राम वर काही फोटो टाकले तर तिला चहाते देखील तेवढेच मोठ्या प्रमाणात लाइक करत असतात आणि तिच्या फोटो वर कमेंट करत असतात.

श्रेया बुगडे हिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तसेच इंस्टाग्राम वर देखील हा फोटो टाकलेला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या मोठ्या बहिणी सोबत दिसत आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव तेजल असे आहे. मात्र, या दोघींच्या उंचीमध्ये थोडा फरक आहे. तेजल थोडी उंच आहे.

श्रेया बुगडे हिने 2015 मध्ये लग्न केले आहे. श्रेया बुगडेच्या पतीचे नाव निखिल शेठ असे आहे. दोघांच्या कुटुंबीयांच्या संमतीनेच या दोघांनी लग्न केले आहे. श्रेयाचा पती निखिल हा देखील चित्रपट संबंधितच आहे. त्याने अनेक मालिका चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. तो निर्माता देखील आहे. या दोघांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे बाऊंडिंग आहे.

हे दोघेही सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टला चाहते देखील लाईक करत असतात.

Team Hou De Viral