‘चला हवा येऊ द्या’ मधल्या श्रेया बुगडे’ने दिली ‘गोडं बातमी’

‘चला हवा येऊ द्या’ मधल्या श्रेया बुगडे’ने दिली ‘गोडं बातमी’

छोट्या पडद्यावर चला हवा येऊ द्या हा शो अत्यंत लोकप्रिय झाला आहे. या शो मधून सामाजिक संदेश देण्यासोबत सर्वांना हसवण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात होते.

आपल्याला अनेक कलाकार हे यामध्ये दिसतात. यामध्ये कुशाल बद्रिके, भाऊ कदम, सागर करंडे, डॉक्टर निलेश साबळे, श्रेया बुगडे यांच्यासह इतरांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका असतात.भरत गणेशपुरे आपल्या अफलातून टाईम प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आज आम्ही आपल्याला श्रेया बुगडे हिच्या बाबतीमधील एक बातमी देणार आहोत.

श्रेया बुगडे हिने अनेक मालिकांतून काम केले आहे. तसेच रियालिटी शोमध्ये देखील काम करते. तिचा सेन्स ऑफ ह्युमर हा कमालीचा आहे. ती विनोद देखील तितक्याच चांगल्या अंदाजाने करत असते. श्रेया बुगडे हिने चला हवा येऊ द्या या मालिकेमध्ये तर अफलातून असे काम केले आहे. तिची जोडी ही कोणासोबतही उठून दिसत असते.

वैयक्तिक आयुष्यात देखील ती आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर तिचे अकाउंट आहे. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. श्रेया बुगडे हिने इंस्टाग्राम वर काही फोटो टाकले तर तिला चहाते देखील तेवढेच मोठ्या प्रमाणात लाइक करत असतात आणि तिच्या फोटो वर कमेंट करत असतात.

श्रेया बुगडे हिला एक मोठी बहीण असून तिच्या मोठ्या बहिणीचे नाव तेजल असे आहे. मात्र, या दोघींच्या उंचीमध्ये थोडा फरक आहे. तेजल थोडी उंच आहे. दोघींमध्ये खूप बॉण्डिंग असल्याचे ती सांगते. त्याचबरोबर दोघी बहिणी सोशल मीडियावर आपले अनेकदा फोटो देखील शेअर करत असतात. आता श्रेया बुगडे हिच्या बाबतीतली एक बातमी समोर आली आहे.

श्रेया बुगडे हिला नुकताच एक पुरस्कार भेटला आहे. हा पुरस्कार भेटल्याने आपल्याला खूप आनंद झाला, असे देखील तिने सांगितले आहे. श्रेया बुगडे हिला लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशनचा मृदंग पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबतची बातमी सध्या अनेक वर्तमानपत्रातून देखील छापून आली आहे. याबाबत बोलताना श्रेया हिने आनंद व्यक्त करून आपल्याला हा सन्मान म्हणजे आपल्या अभिनयाची दखल घेतली असल्याचे तिने सांगितले आहे.

याचबरोबर या पुरस्कारांमध्ये संजय मोने, रवींद्र साठे, देवकी पंडित यांच्यासह अनेकांना हा पुरस्कार मिळाला आहे, तर आपल्याला श्रेया बुगडे ही आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral