श्रेयस अय्यर आणि चहलची पत्नी धनश्री वर्माचा भन्नाट डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल

श्रेयस अय्यर आणि चहलची पत्नी धनश्री वर्माचा भन्नाट डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल

भारतीय संघातील स्पिनर आणि प्रसिद्ध गोलंदाज यजुवेंद्र चहल त्याच्या लग्नामुळे खूप चर्चेत आला. आता पुन्हा एकदा त्याच्या पत्नीमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. चहलसोबत रेशीमगाठ बांधल्यानंतर धनश्रीचा फॅन फॉलोइंग चांगलाच वाढला आहे.

धनश्रीचा डान्स चहलच्या चाहत्यांनाही तुफान आवडतो. आता आणखीन एक धनश्रीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भारतीय संघाचा गोलंदाज श्रेयस अय्यरसोबत धनश्रीनं तुफान डान्स केला आहे. या डान्समध्ये धनश्रीनं केलेल्या स्टेप्सची तर सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

श्रेयस अय्यरही या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. श्रेयसनं या डान्सचा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. श्रेयसच्या डान्समधील स्टेप्स पाहून चाहतेही फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या डान्सची तुफान चर्चा रंगली आहे.

धनश्री वर्मा आपल्या इन्स्टावर चाहत्यांसाठी डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करत असते. याआधी इंग्रजी गाण्यावर तिचा डान्स तुफान व्हायरल झाला होता. युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी -२० मालिकेदरम्यान भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसतील पण त्याआधी हे दोन्ही क्रिकेटपटू विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत.

युजवेंद्र चहल हरियाणाचे सदस्य असून श्रेयस अय्यर हे मुंबईचे कर्णधार असणार आहेत. धनश्री आणि श्रेयस अय्यरच्या डान्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. धनश्री आणि श्रेयस अय्यरच्या धमाल डान्सनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. धनश्रीचा स्वत:चा युट्यूब चॅनल आहे. ज्यावर 15 लाखहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral