दुःखद ! अभिनेता श्रेयश तळपदे वर आली होती स्वतःचे लग्न तोडण्याची वेळ…

दुःखद ! अभिनेता श्रेयश तळपदे वर आली होती स्वतःचे लग्न तोडण्याची वेळ…

श्रेयस तळपदे सध्या आपल्याला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये दिसत आहे. या मालिकेमध्ये त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. श्रेयस तळपदे याने अनेक वर्षानंतर या मालिकेमध्ये पुनरागमन केले आहे.

काही वर्षांपूर्वी त्याने आभाळमाया मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त असे काम केले होते. मात्र, त्यानंतर त्याला अनेक चित्रपटाच्या ऑफर देखील मिळाल्या. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. काही वर्षांपूर्वी श्रेयस तळपदे याने इक्बाल या चित्रपटात काम केले होते. त्याने या चित्रपटात एका क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती.

अतिशय खडतर परिस्थितीतून हा खेळाडू कसा वर जातो, याची माहिती या चित्रपटात दाखवण्यात आली होती. या चित्रपटामध्ये आपल्याला मराठमोळ्या प्रतीक्षा लोणकर देखील दिसल्या होत्या. प्रतीक्षा लोणकर यांनी या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे याच्या आईची भूमिका साकारली होती. त्यानंतर श्रेयस तळपदे याने रोहित शेट्टी याच्या अनेक चित्रपटात काम केले.

गोलमाल सिरीजमध्ये देखील त्याने काम केले. ओम शांती ओम या चित्रपटात त्याने शाहरुख खानसोबत काम केले. त्याचा हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता. मात्र, आता इक्बाल चित्रपटाच्या वेळेसचा एक किस्सा तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. कारण की इक्बाल चित्रपटाच्या वेळेस श्रेयस हा अतिशय तरुण होता आणि त्याच वेळेस त्याचे लग्न देखील ठरले होते.

याबाबत सांगितले की, त्यावेळेस माझे लग्न ठरले होते आणि मला तीन दिवसाची सुट्टी पाहिजे होती. मात्र, या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मला सुट्टी देण्यास नकार दिला होता आणि तसेच लग्न तुझे रद्द करा, असेही सांगितले होते. मात्र, मी त्यांना सांगितले होते की, मी बाहेर कोणाला काही कळू देणार नाही. त्यांच्याशी इच्छा होती की, लग्नबाबत कोणालाही काही माहिती करू नये.

मात्र, दिग्दर्शक काही सुट्टी देण्यासाठी तयार नव्हते. त्यानंतर श्रेयस तळपदे याने एका दिवसात लग्न केले आणि आपले लग्न झाल्याचे कुणालाही सांगितले नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने सगळ्यांना लग्न झाल्याचे सांगितले, असा हा किस्सा श्रेयस याने सांगितला आहे.

Team Hou De Viral