‘दृश्यम 2’ मधल्या अभिनेत्रीचा झाला मॅटर, ‘त्या’ कारणासाठी तिच्यावर होतेय मोठ्या प्रमाणात टीका

‘दृश्यम 2’ मधल्या अभिनेत्रीचा झाला मॅटर, ‘त्या’ कारणासाठी तिच्यावर होतेय मोठ्या प्रमाणात टीका

सध्या अजय देवगन स्टारर दृष्यम 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली आहे. दृश्यम हा चित्रपट सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता सात वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटामध्ये आपल्याला अजय देवगन श्रिया सरण याच्यासह मृणाल जाधव दिसली आहे. त्याचबरोबर इतर मराठी कलाकारांच्या भूमिका देखील या चित्रपटात चांगल्या पद्धतीने केल्या आहेत. या चित्रपटाची कथा ही अतिशय रंजक अशी झालेली आहे. या चित्रपटामध्ये पहिल्या भागात जो सस्पेन्स दाखवला होता, तो सस्पेन्स आता दुसऱ्या भागात देखील मोठ्या प्रमाणात आहे.

या चित्रपटामध्ये प्रथमेश परब याने देखील काम केले आहे. प्रथमेश परब याने या चित्रपटात होजे ही भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर इतर कलाकारांच्या भूमिका अतिशय व्यवस्थितरित्या झाल्या आहेत. अजय देवगन आणि तब्बू अनेक वर्षानंतर या चित्रपटात एकत्र काम करताना दिसत आहेत. तब्बू हिने देखील अतिशय चांगले काम या चित्रपटात केले आहे.

आता दृश्यम टू या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा चित्रपट दोनशे कोटी रुपयांची कमाई देखील करू शकतो, असेही अनेकांनी सांगितले आहे. या चित्रपटामध्ये साधी सोजोळ दिसणारी श्रिया सरण खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आणि ब्युटीफूल अशी आहे.

आता तिच्या बाबतीतला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती विमानतळावर आपल्या पतीसोबत लीप लॉक करताना दिसत आहे. ती आपल्या पतीचे चुंबन घेताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी टीका केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने वागणे अतिशय चुकीचे आहे, तुम्हाला घरदार नाही आहे का? अशी कमेंट एका चाहत्यांनी केली आहे, तर तुम्ही तुमच वैयक्तिक आयुष्य हे सगळ्यांना कशाला दाखवता असे देखील एकाने म्हटले आहे, तर एकूणच श्रिया सरण हिच्यावर आता अनेकांनी टीका केली आहे, तर आपल्याला श्रिया सरण आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral