आशा भोसले यांच्यासोबत दिसणारी ही चिमुकली आज आहे तेलगू तसेच बॉलिवूडमधली हॉट अभिनेत्री, जाणून घ्या ती आहे तरी कोण

आशा भोसले यांच्यासोबत दिसणारी ही चिमुकली आज आहे तेलगू तसेच बॉलिवूडमधली हॉट अभिनेत्री, जाणून घ्या ती आहे तरी कोण

सोशल मीडियामूळे सेलेब्रिटी आणि चाहत्यांचे अंतर अगदी कमी झाले आहे. आणि बॉलिवूडमधील कलाकारही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते सोशल मीडियामार्फत त्यांचे खाजगी फोटो शेअर करत असतात. त्यांच्या हॉलिडेचे, लहानपणीचे, कुटुंबियांचे फोटो त्यांच्या फॅन्ससाठी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूडचे सेलेब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत होते. त्यात आता आशा भोसलेंसोबत अजून एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो कुणी शेअर केला आणि फोटोमध्ये दिसणारी चिमुकली आहे तरी कोण ते आपण जाणून घेणार आहोत.

कमल हासनची मुलगी श्रुती हासन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तसेच इन्स्टाग्रामला तिच्या चाहत्यांकडून देखील तिचे अनेक फॅन पेज चालवले जातात. अशाच एका फॅन पेजवर नुकताच श्रुतीचा एक जुना फोटो शेअर केला गेला असून या फोटोची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

श्रुतीच्या फॅन पेजवर शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पाहायला मिळत आहे. त्यांच्यासोबत एक चिमुकली असून ही चिमुकली गाताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून श्रुतीने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत श्रुतीने कॅप्शन लिहिले आहे की, शाळेच्या ड्रेसमध्ये गात असतानाचा माझा हा फोटो मला प्रचंड आवडतो. एका ज्येष्ठ गायिकेसोबत गाताना माझी काय अवस्था झाली होती हे मी आज देखील विसरू शकत नाही. तो दिवस अविस्मरणीय होता. माझ्या आयुष्यातील ही खूपच चांगली आठवण असून हा फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद…

या फोटोत श्रुतीला ओळखणे देखील कठीण जात आहे. या फोटोत श्रुती गात असताना आशा भोसले अतिशय शांतपणे गाणे ऐकत असताना आपल्याला दिसत आहेत. हा फोटो श्रुतीच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

श्रुती एक खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली गायिका असल्याचे तिने सिद्ध केले आहे. 2008 मध्ये ‘लक’ या बॉलिवूड चित्रपटातून श्रुतीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर 2011 मध्ये तेलगू इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. हा सिनेमाही आपटला.

पण यानंतर तिने साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. श्रुती प्रसिद्ध अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री सारीका यांची मोठी मुलगी आहे. आणि तिला एक बहीण देखील आहे. श्रुतीने बॉलिवूड मध्येदेखील अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral