फोटोत दिसणारी अभिनेत्री नसून आहे मराठीतला प्रसिद्ध अभिनेता, ओळखल का तुम्ही

फोटोत दिसणारी अभिनेत्री नसून आहे मराठीतला प्रसिद्ध अभिनेता, ओळखल का तुम्ही

फोटोतील हा चेहरा जरा निरखून पाहा… कारण ही अभिनेत्री नाही तर स्त्री वेशात एक अभिनेता आहे. त्याचे नाव काय तर स्वप्निल जोशी. होय, मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि हा फोटो क्षणात व्हायरल झाला.

या फोटोमध्ये स्वप्निल स्त्री वेशात दिसत आहे. त्याने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. आता हा स्त्री वेश कशासाठी तर ‘तेरे घरच्या समोर’च्या आठवणीत. ‘तेरे घरच्या समोर’ या मालिकेत स्वप्निल जोशी एका आगळ्यावेगळ्या रूपात दिसला होता. या मालिकेत स्वप्नीलने स्त्री पात्र साकारले होते. या भूमिकेची आठवण त्याने यावेळी शेअर केली.

‘तेरे घरच्या समोर ही मालिका करताना दिग्गज कलाकारांकडून बरंच काही शिकता आलं. हा अनुभव मला समृद्ध करून गेलाय. स्त्री भूमिका साकारणं, ‘ती’ होणं खरंच सोपं नाही. ‘ती’ जखमांच गोंदण मिरवणारी सक्षम सखी आहे. जी स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून आहे. अश्या प्रत्येक ‘ती’च स्वप्न पूर्ण करायला shop with ti तयार आहे’, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.

स्वप्निलने वयाच्या ९व्या वर्षी रामायण मालिकेत कुशची भूमिका साकारली आणि तिथेच त्याच्या करिअरची गाडी सुरू झाली ती आजपर्यंत. रामायणातील कुशनंतर अमानत, हद्द कर दी, भाभी, तेरे घरच्या समोर अशा अनेक मालिका तर गुलाम-ए-मुस्तफा, दिल विल प्यार व्यार अशा चित्रपटांत त्याने विविध भूमिका साकारल्या.

पण त्याला खरा ब्रेक मिळाला तो अधुरी एक कहाणी या मालिकेतील मुख्य भूमिकेनंतर. त्या मालिकेतून मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला एक नवा चेहरा सापडला आणि त्यानंतर चेकमेट, आम्ही सातपुते, मुंबई-पुणे-मुंबई, दुनियादारी, मंगलाष्टक वन्स मोअर, पोरबाजार, प्यारवाली लव्ह स्टोरी, वेलकम जिंदगी, मितवा, तू हि रे असे एक से बढकर एक चित्रपट त्याने दिले.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral