‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील ‘या’ कलाकाराला बनण्याचे होते क्रिकेटर, जाणून घ्या त्याबाबत

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील ‘या’ कलाकाराला बनण्याचे होते क्रिकेटर, जाणून घ्या त्याबाबत

“फुलाला सुगंध मातीचा” या मालिकेत आता नव्याने ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण आता या मालिकेमध्ये एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्रीचे मीरा जोशी असे आहे. या मालिकेमध्ये ती शुभम याची मैत्रीण दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या मालिकेत काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मीरा जोशी हिने या आधी देखील “श्रीमंताच्या घरची सून” या मालिकेत काम केलेले आहे. “सारे तुझ्यासाठी” ही मालिका चांगलीच गाजली होती. ऑक्टोबर 2020 रोजी तिने गुरु दिवेकर या अभिनेत्यासोबत लग्न केले आहे. गुरु आधी आपल्याला शुभमंगलऑनलाइन या चित्रपटात दिसला होता. आता दोघेही चांगले नेटाने संसार करताना दिसताहेत.

मालिकेमध्ये कीर्ती आणि शुभम यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. कीर्तीला हैदराबाद येथे ट्रेनिंगसाठी जायचे असते. मात्र, तिच्या कुटुंबियांचा विरोध असतो. मात्र, शुभम हा तिला यासाठी परवानगी मिळवून देतो. त्यानंतर ती हैदराबादला जाते. त्यामुळे या मालिकेत आता काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. कारण आता या मालिकेमध्ये मीरा जोशीची एन्ट्री झालेली आहे.

या मालिकेमध्ये मीरा जोशी नेमकी कुठली भूमिका साकारणार आहे, हे तर आपल्याला लवकरच कळेल. मात्र, असेही सांगण्यात येते की, मीरा जोशी या मालिकेत शुभम ची मैत्रीण दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या मालिकेत लव्ह ट्रँगल निर्माण होतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण कीर्ती हिच्या अनुपस्थितीमध्ये शुभम आणि मीरा यांचे प्रेम प्रकरण होते का? याबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत.

या मालिकेमध्ये शुभम ही भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडते. त्याने अतिशय चांगल्या प्रकारे काम या मालिकेत केलेले आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची त्याची कला हे अनेकांना आवडते. शुभम याचे खरे नाव हे हर्षद अतकरी असे आहे. हर्षद अतकरी याने आजवर अनेक मालिका चित्रपटांत काम केले आहे. हर्षद याचा जन्म 17 ऑक्टोबर 19 87 रोजी मुंबईमध्ये झालेला आहे.

त्याने शालेय शिक्षण मुंबई पूर्ण केल्यानंतर मुंबई मधूनच एमबीए मध्ये आपली पदवी संपादन केली आहे. मात्र कॉलेजमध्ये असताना त्याला क्रिकेटर बनायचे होते. मित्रांच्या आग्रहाखातर तो कॉलेजमधल्या एकांकिकांमध्ये काम करू लागला. त्यानंतर त्याला नाटक करण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्याने अनेक नाटकांमध्ये देखील काम केले.

आता त्याने अभिनय क्षेत्रात काम करण्याचे नक्की केले होते. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्याला एकापाठोपाठ नाटके भेटत गेली. हर्षद अतकरी याने दूर्वा या मालिकेत देखील काम केले. दुर्वा ही मालिका त्याची खूप गाजली होती. या मालिकेत त्याने साकारलेले केशव हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. त्याचबरोबर त्याने अंजली या मालिकेतही काम केले होते.

सारे तुझ्यासाठी ही मालिका देखील त्याची खूप गाजली होती. त्याचबरोबर शुभम म्हणजेच हर्षद याने हिंदी मालिकामध्ये देखील काम केले आहे.

Team Hou De Viral