धक्कादायक ! रविवारची सुट्टी मगितली म्हणून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मालिकेतून हकालपट्टी

धक्कादायक ! रविवारची सुट्टी मगितली म्हणून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मालिकेतून हकालपट्टी

इंग्रज भारतावर आक्रमण करून आले. त्यानंतर भारतात बरीच वर्षे राहिली आणि भारतावर राज्य देखील केले. आता आम्ही इंग्रजांचं इथे काय काम आहे, असा आपल्याला प्रश्न पडला असेल.

मात्र, त्याचा संदर्भ येथे आहे. याचे कारण म्हणजे इंग्रज भारतात आले. त्यानंतर त्यांनी कामगारांना सुट्ट्या देखील देण्याचे ठरवले होते. त्यानुसार रविवारी प्रत्येक कामगाराला सुट्टी मिळायची. कालांतराने आपल्याकडे कामाच्या आवश्यकतेनुसार खाजगी कंपन्यांमध्ये सुट्ट्या बदलण्यात आल्या.

मात्र, सरकारी कार्यालय आणि इतर बऱ्याच कंपन्यांमध्ये आता रविवारची सुट्टी असते. आठवड्यातून एक दिवस काम करण्याला आराम मिळावा, हा त्यामागचा हेतू असतो. नाही तर सातत्याने काम करून माणसाला थकवा जाणवतो आणि त्याचे कामात मग मन रमत नाही.मात्र चित्रपट सृष्टी मध्ये काम करणाऱ्या कलाकारांना अशा सुट्ट्या मिळत नसतात, असे बोलले जात आहे.

कारण की एका अभिनेत्रीने याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. मात्र सतत कधीतरी काम असते आणि कधी काम हे मिळतच नाही, असं देखील दुर्दैव या कलाकाराच्या वाट्याला पाहायला मिळते. आज आम्ही आपल्याला एका दिग्गज अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. तिने देखील आपली खंत बोलून दाखवली आहे.

कसोटी जिंदगी की 2 आणि बडे अच्छे लगते है तो अशा मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शुभांगी चौक्सी हिच्या आयुष्यात अनेक दुःखद घटना घडली आहे. रविवारची सुट्टी मागितली म्हणून तिला एक नाही तर तब्बल दोन मालिकांमधून बाहेर काढण्यात आले.

स्वतः या प्रकरणाचा खुलासा करताना तिने म्हटलंय की काम करणं सुरू केलं तेव्हा, मी रविवारी देखील काम करत होते. पण जेव्हा माझा मुलगा आरव झाला. त्यानंतर पुन्हा काम सुरू करताना आम्ही निर्णय घेतला की, नवर्‍याला आणि मुलाला दोघांनाही वेळ देण्यासाठी एक दिवस तरी सुट्टी घेत जाईन. मी 2012 पासून काम करते.

मी आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेत होते. ती पुढे म्हणाली, मी अनेकदा त्या लोकांना माझ्या रविवारची सुट्टी विषयी सांगत होते. तर ते म्हणायचे सुटी मिळणार नाही. पण मी माझ्या सुट्टीवरून अडून बसायचे आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये नमूद करायला सांगायचे, तेव्हा सुरुवातीला मागेपुढे करायचे ते लोक.. त्यांना कळायचं ते मान्य करायचे.

अशी खूप जणांनी ही माझी मागणी मान्य केली होती. मात्र आता आतापर्यंत रविवारच्या सुट्टीमुळे अनेक मालिकांमधून मला बाहेर पडावे लागले आहे. अभिनय क्षेत्रातही रविवारची सुट्टी कंपल्सरी करायला हवी, अशी मागणी तिने केली आहे, तर तुम्हाला शुभांगी हीची मागणी योग्य वाटते का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगा.

Team Hou De Viral