या मराठमोळ्या अभिनेत्रीने गपचूप उरकला साखरपुडा? चाहत्यांना सुखद धक्का

या मराठमोळ्या अभिनेत्रीने गपचूप उरकला साखरपुडा? चाहत्यांना सुखद धक्का

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या अनेकांना लग्नाचे वेध लागल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक अभिनेत्री सध्या आपल्या प्रियकरांसोबत लग्न थाटत असल्याचे देखील दिसत आहेत. काही दिवसापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने तिचा प्रियकर याच्यासोबत आपला साखरपुडा उरकला आहे.

भाग्यश्री हिचा प्रियकर हा प्रसिद्ध अभिनेता रितिक रोशन याचा मेकअप आर्टिस्ट आहे. या दोघांच्या साखरपुड्यात अभिनेता रितिक रोशन देखील आला होता. दोन वर्षांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेदेखील तिचा प्रियकर कुणाल बेनोडेकर यांच्यासोबत आपले लग्न केले. त्यांच्या लग्नाला सुरुवातीला कोणीच नव्हते.

त्यामुळे सोनाली कुलकर्णी हिने दुसऱ्यांदा देखील आपले लग्न होऊन घेतले आणि या लग्नाला आपल्या अनेक नातेवाईकांना त्यांनी बोलवले होते. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या प्रियकरा सोबत साखरपुडा उरकला आहे. तसेच या अभिनेत्रीने आपले फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चहात्यांशी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न केला आहे. तिने आपण लवकरच लग्न करणार असल्याचे देखील म्हटले आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमकी कोण आहे ही अभिनेत्री. ससुराल सिमर का सीजन दोन आणि बॉईज या चित्रपटातील शुभांगी तंबाळे हिने तिचा मित्र करण मेहता याच्यासोबत साखरपुडा केला आहे. याबाबतचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आता हे दोघे लग्न कधी करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. एकूणच काय तर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या अनेकांना लग्नाचे वेध लागल्याचे दिसत आहेत. ससुराल सिमर का ही मालिका फारच लोकप्रिय झाली. या मालिकेतून शुभांगी घराघरात स्थान मिळाले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. शुभांगी हिची ही पहिलीच हिंदी मालिका होती.

शुभांगी हिने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटातही काम केले होते. त्यानंतर तिला अनेक मालिका यादेखील मिळाल्या. त्यानंतर तिने बॉईज 2 या चित्रपटातही आपल्या अभिनयाची छाप सोडण्याचे पाहायला मिळाली. आता करण आणि शुभांगी यांनी साखरपुडा उरकून सगळ्यांना धक्का दिला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. आता या दोघांचे नाते हे संसारात फुलणार आहे. त्यांच्या या नात्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Team Hou De Viral