श्वेता शिंदेचा पती आहे हा प्रसिद्ध अभिनेता, पाहा त्याचे फोटो

श्वेता शिंदेचा पती आहे हा प्रसिद्ध अभिनेता, पाहा त्याचे फोटो

‘कुमकुम’, ‘घराना’ यांसारख्या हिंदी आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या मराठी मालिकांतील सशक्त भूमिकांमुळे प्रेक्षकांना परिचित असलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. श्वेताने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘देऊळबंद’, ‘इश्श्य’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने भूमिका साकारल्या होत्या. श्वेताने एक अभिनेत्री म्हणून आपले स्थान निर्माण केल्यानंतर ती निर्मितीकडे वळली. झी मराठीवरील लागिरं झालं जी या मालिकेची तिने निर्मिती केली होती. या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

आता साता जल्माच्या गाठी आणि मिसेस मुख्यमंत्री या मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या दोन्ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.श्वेताने लग्न आणि मूल झाल्यानंतर अभिनेत्री म्हणून ब्रेक घेतला होता. पण लक्ष्य या मालिकेद्वारे तिने कमबॅक केला. आता अभिनेत्रीप्रमाणेच निर्माती म्हणून तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

श्वेताचा नवरादेखील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. श्वेताच्या पतीचे नाव संदीप भन्साळी असून त्याने वो रहनेवाली महलों की, इश्वर साक्षी, क्रीस औक कृष्णा, मोहिनी, प्यार के दो नाम-एक राधा एक श्याम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

अपराधी कौन या मालिकेच्या सेटवर श्वेता आणि संदीप यांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. काहीच महिन्यांच्या अफेअरनंतर म्हणजेच 2007 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांनी पुण्यात अगदी मोजक्या नातलगांच्या उपस्थित लग्न केले होते.

संदीप एक अभिनेता असला तरी तो सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. तो सध्या त्याचा बिझनेस सांभाळत असून त्यांचा कपड्यांचा भलामोठा व्यवसाय आहे. त्यांची कपड्यांची अनेक दुकाने आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral