‘मुलगी झाली हो मधील’ या अभिनेत्रीच झालं केळवण, लवकरच होणार लग्न

‘मुलगी झाली हो मधील’ या अभिनेत्रीच झालं केळवण, लवकरच होणार लग्न

मुलगी झाली हो’ ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच 200 भाग पूर्ण केले होते. या मालिकेतील माऊ, आर्या, विलास, सिद्धांत, दमयंती यांचे पात्र चांगलेच गाजत आहे. आर्या ही भूमिका श्वेता आंबेकर‌ हिने साकारली आहे.

श्वेता हिने या आधी अनेक चित्रपट व मालिकातून काम केले आहे. श्वेता हिने माझे मन तुझे झाले, दूर्वा, पुढच,पाऊल, बाजी, तू माझा सांगती, दिल दोस्ती दुनियादारी यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने भेट या चित्रपटात देखील काम केले आहे. श्वेता ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.

काही महिन्यांपूर्वीच इंस्टाग्राम वर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये ती म्हणते की, कोरोना महामारीमुळे मी माझ्या वडिलांना देखील गमावले आहे. तिने ही भावनिक पोस्ट टाकल्याने अनेक चाहत्यांनी तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. पुढे ती म्हणते की, ‘बाबा तुमच्या शिवाय जगणं खूप अवघड आहे’, तुम्ही आम्हाला सोडून का गेला.

तिच्या या स्टेटमेंटवर अनेक चाहत्यांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत शौनक आणि माऊ च्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत होती. आता मालिकेतील एका अभिनेत्रीच्या रियल लाईफ मध्ये लग्नाची धामधूम सुरू आहे.

मालिकेत आर्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता अंबेकर लवकरच रियल लाईफ मध्ये लग्न करणार आहे. नुकताच तिला केळवण करण्यात आल आहे. त्यामुळे आता लवकरच ती लग्न करणार असल्याचं समजतय. श्वेता तिचा मित्र दिग्दर्शक असलेल्या अमेय गोरेसोबत लग्न करणार आहे.

अमेय हा लेखक दिग्दर्शक असून तो होतकरू कलाकारांसाठी अकॅडमी देखील चालवतो. श्वेता आणि अमेय गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत, तर श्वेता अमेयची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

Team Hou De Viral