ज्या रस्त्यावर अभिनेत्याचे वडील झोपायचे त्याच्या समोरील टॉवरमध्ये ‘या’ मराठी अभिनेत्याने घेतलं आलिशान घर

ज्या रस्त्यावर अभिनेत्याचे वडील झोपायचे त्याच्या समोरील टॉवरमध्ये ‘या’ मराठी अभिनेत्याने घेतलं आलिशान घर

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक असे अभिनेते आहेत की, जे आपल्या कर्तृत्वाने मोठे झाले आहेत. अनेकांना मुंबईत राहण्यासाठी घर देखील नव्हते. मात्र, या अभिनेत्यांनी मोठे कष्ट करून मुंबई स्वतःचे घर घेतले आहे. आज आम्ही आपल्याला सिद्धार्थ जाधव याबद्दल माहिती देणार आहोत.

सिद्धार्थ जाधव याने आजवर अनेक मराठी चित्रपटातून काम केले आहे. तसेच त्याने हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. सिद्धार्थ जाधव आपल्या अफलातून कॉमेडी सेन्स साठी जाणला जातो. सिद्धार्थ जाधव याने याआधी अगबाई अरेच्या, जत्रा, टाइम प्लीज या चित्रपटात काम केले आहे.

तसेच त्याचा मकरंद अनासपुरे सोबत दे धक्का हा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता.सिद्धार्थ जाधव याने काही हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. गोलमाल आणि गोलमाल रिटर्न या चित्रपटात तो दिसला होता. त्यानंतर रोहित शेट्टी यांच्या सिंबा या चित्रपटात देखील तो दिसला होता. सिद्धार्थ जाधव याने काही महिन्यांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा फोटो सध्या खूप मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता. या फोटोमध्ये त्याच्यासोबत दिग्गज दिग्दर्शक व अभिनेते प्रभुदेवा दिसताहेत. प्रभुदेवा सोबत त्याने फोटो शेअर करून त्या खाली लिहिले आहे की, एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आपण भविष्यात चित्रपटात काम करू, हे कधीही विचार करू शकत नाही.

मला ती संधी मिळाली आणि मी ती संधी कधीही सोडत नाही. यावर माझा विश्वासच बसत नाही. लहानपणी मी प्रभू देवा यांच्या ‘हमसे है मुकाबला’ या चित्रपटाचे पोस्टर असलेले दप्तर शाळेत घेऊन जात होतो. भविष्यामध्ये याच दिग्दर्शकासोबत मला काम करण्याची संधी मिळेल, असे कधीही स्वप्नात वाटले नव्हते.

सिद्धार्थ जाधव सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील आता होऊदे ना धिंगाणा या शोमध्ये दिसत आहे. या शोचे तो सूत्र संचालन करत आहे. या शोमध्ये नुकतेच त्याचे आई-वडील देखील आले होते. यावेळेस तो खूपच भावुक झाल्याचे दिसले. सिद्धार्थ जाधव यावेळेस म्हणाला की, माझे वडील एका सिनेमागृहाच्या बाहेर पेपर अंथरून झोपायचे.

आज मी त्या जागेसमोरच आलिशान टावरमध्ये घर घेतले आहे, असे त्याने सांगितले. हे सांगताच त्याच्या वडिलांनाही आनंदाश्रू आले. त्याच्या वडिलांनी देखील आपल्या मुलाचे कौतुक करून सांगितले की, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. मी ज्या ठिकाणी झोपायचं त्याच्या समोरच त्याने घर घेतले आहे.

यावेळेस या कार्यक्रमाला प्रिया मराठे हिच्या सोबतच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. एकूणच सिद्धार्थ यावेळेस खूपच भावुक झाल्याचे दिसले.

Team Hou De Viral