मोठा खुलासा ! सिद्धार्थच्या आईने पोलिसांना सांगितलं ‘त्या’ रात्री काय घडलं

मोठा खुलासा ! सिद्धार्थच्या आईने पोलिसांना सांगितलं ‘त्या’ रात्री काय घडलं

बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्ला याचं वयाच्या ४० व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केले. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्यानं टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थनं काही औषधं घेतली होती.

त्यानंतर सकाळी सिद्धार्थ झोपेतून उठलाच नाही. आता, सिद्धार्थच्या आईनेही पोलिसांच्या मागणीनुसार जबाब नोंदवला आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्यानं बॉलिवूड विश्वाला धक्का बसला आहे. सिद्धार्थचा मित्र करण कुंद्रालाही हा मोठा धक्का आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या सिरियलमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे. सिद्धार्थच्या मृत्यूपूर्वी करण कुंद्रासोबत त्याचं अखेरचं बोलणं झालं होतं.

करण कुंद्रानं सिद्धार्थ शुक्लासोबतचा फोटो शेअर करत सोशल मीडियात पोस्ट केले आहे. पोलिसांकडून सिद्धार्थच्या मृत्युची सखोली चौकशी सुरू असून निकटवर्तीयांचे आणि जवळच्या नातवाईकांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. त्यानुसार, सिद्धार्थच्या आईचा जबाब नोंदविण्यात आला. त्यामध्ये, रात्रीपर्यंत सिद्धार्थ ठीक होता, रात्री जेवणानंतर तो झोपायला गेला.

मात्र, सकाळी तो उठलाच नाही, असा जबाब आईने नोंदवला आहे. दरम्यान, यापूर्वीच सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी तो कुठल्याही मानसिक तणावात नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. शॉकिंग, काल रात्रीच आम्ही दोघं फोनवर बोलत होतो. आमच्या दौघांपैकी इंडस्ट्रीमध्ये कोण चांगलं काम करतंय यावर चर्चा होत होती. विश्वास बसत नाही, मित्रा तू लवकर गेलास. नेहमी हसत राहा. खूप दु:खं होतंय असं त्याने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्ला पोस्टमोर्टमची व्हिडीओग्राफी करण्यात आली. संध्याकाळी ६ पर्यंत पोस्टमोर्टम पूर्ण होईल. पोलिसांच्या सूत्रांनुसार, रात्री ३ च्या दरम्यान सिद्धार्थ शुक्लाची तब्येत थोडी बिघडली होती. त्याला वेदना आणि अस्वस्थ वाटत होतं. त्याबाबत त्याने आईला सांगितले. सिद्धार्थ शुक्लाच्या आईनं त्याला पाणी पाजलं आणि पुन्हा झोपवलं. परंतु सकाळी सिद्धार्थ उठलाच नाही.

बिग बॉस कार्यक्रमाचा होस्ट आणि अभिनेता सलमान खानने सिद्धार्थच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तू कायम स्मरणात राहशील असं सलमान म्हटला आहे.

Team Hou De Viral